आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यात अडकलेल्या वाहनांची मोबाइल अॅपद्वारे मदत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेत हिमवादळ आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमध्ये अडकलेल्या वाहनांना मदत करण्याचा व्यापार दहा अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. आता टेक कंपन्या या व्यापारातील मोठ्या खेळाडूंना आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. ते असे कॉल सेंटर बनवत आहेत, ज्याच्या मदतीने खड्डयात अडकलेल्या कुठल्याही गाडीला मदत करण्यासाठी जवळील वाहनाची मदत घेतली जाऊ शकेल. लोक ज्या सेवा वापरतात त्यांचेच त्यांनी पैसे दिले पाहिजे, असे अर्जेंटली कंपनीचे कार्यकारी अधिकारी क्रीस स्पेनोस यांचे मानणे आहे. सध्या वाहन चालकांना गरजेच्या वेळी डोळे झाकून गाडी टो करणाऱ्या कंपनीची सेवा घ्यावी लागते. त्यासाठी जास्त पैसे मोजावे लागले तरी त्यांना चालते. तसेच इन्शुरन्स सेवांचे आहे. त्यांचाही मागणी तसा पुरवठा असा पर्याय असावा.
अर्जेंटली आणि त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी होंक अापल्या अॅपमध्ये नकाशाच्या माध्यमातून उपभोक्त्याला त्यांना मदत करणारे कुठे आहेत याची माहिती देतात. तसेच किती वेळात त्यांच्यापर्यंत पोहोचेल. या कंपन्या स्मार्ट फोन यूजरसह गाड्या टो करणाऱ्या कंपन्यांसाठीही कमाईचे साधन आहे. त्यांचा सामना पाच कोटी ५० लाख सदस्य असलेली विशाल कंपनी ‘आ’ (अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन- AAA) सोबत आहे. ती नफा कमवत नाही. कंपनी अापल्या कंत्राटदारांना देण्यात येणाऱ्या पैशाचे विवरण सांगत नाही. दोन ट्रक ऑपरेटरचे म्हणणे आहे की, त्यांना प्रत्येक वेळी १५९३ रुपये मिळतात. स्कॉट्स टोइंगचे मालक क्वामे स्कॉट म्हणतात, अर्जेंटलीकडून कामाचे प्रत्येक वेळी ४७७९ रुपये मिळतात. टॅक्सी सर्व्हिस उबरप्रमाणे या कंपन्या २५ टक्के कमिशन घेतात व बाकीचे चालकाला देतात.
होंकच्या कार्यकारी अधिकारी कोरी ब्रंडेज यांचे म्हणणे आहे की, कंपनीला गेल्या वर्षी ‘आ’ कर्मचाऱ्यांकडून अनेक कामे मिळाली. नंतर ते रद्द करण्याच्या सूचनाही आल्या. ‘आ’च्या प्रवक्त्या योलांडा केड यांनी सांगितले, आम्ही सेवांची तुलना करण्यासाठी असे केले होते. अमेरिकेतील प्रसिद्ध मोटर क्लब जवळपास १०० वर्षांपासून कार्यरत असल्याचे त्या जोर देऊन सांगतात. क्लब दरवर्षी तीन कोटींपेक्षा अधिक डाॅलरचे काम करत आहे. सदस्यांना पर्यटन सूट आणि अन्य सुविधाही मिळतात. ‘आ’ ४३ मोटर क्लबचे फेडरेशन आहे. २०१४ मध्ये क्लबने इतरांसाठी वेब आधारित ऑन डिमांड सेवा रेसक्यूमीनाऊ सुरू केली आहे. ‘आ’च्या अॅपमध्ये नकाशाद्वारे मदत पोहोचवण्याची परिस्थिती दाखवली जाते. तसे सिलीकॉन व्हॅलीचे गुंतवणूकदार व अनेक राष्ट्रीय कंपन्या नवीन लोकांसोबत आहेत. होंकने मार्चमध्ये एक कोटी २० लाख डॉलर जमवले. अर्जेंटलीने घोषणा केली आहे की, त्यांचे अॅप एटीअँडटीशी संलग्न प्लेटफाॅर्म एटीअँडटी ड्राइवचा भाग बनेल.