आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रोबोस्कॅन २-इरिया' मोबाइल डिव्हाइसच्या आधारे संपूर्ण विमानाचे स्कॅनिंग शक्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रोमानिया - विमानांची तपासणी हे िवमान प्राधिकरण सुरक्षा यंत्रणांसाठी मोठे जबाबदारीचे प्रचंड जिकिरीचे काम असते, परंतु जंबोजेटसारख्या महाकाय विमानाची तपासणीही एका डिव्हाइसच्या आधारे अत्यल्प कालावधीत करणे शक्य आहे, हे सांगितले तर कदाचित त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, रुमानियातील एमबी टेलिकॉम या कंपनीने "रोबोस्कॅन २-इरिया' हे डिव्हाइस तयार केले असून त्याच्या आधारे संपूर्ण विमानाचे स्कॅनिंग करून त्यात लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे इतर वस्तू सहजपणे शोधून काढता येतील.

मात्र, या एक्सरे स्कॅनरमधून निघणारे िकरणोत्सार िवमानात बसलेल्या प्रवाशांसाठी सुरक्षित नाहीत, असे म्हटले जात आहे. त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. ही डिव्हाइसप्रणाली विमानांच्या सुरक्षेसाठी अत्यंत उपयुक्त सिद्ध होईल, असा दावा कंपनीने केला आहे.
असे काम करते डिव्हाइस

सीमेवर होतोय उपयोग
एकास्थानिक दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार दशलक्ष युरो (जवळपास ३०० कोटी रुपये) खर्च करून तयार करण्यात आलेल्या या स्कॅनरचा वापर सुरू झाला आहे. सध्या याचा उपयोग पूर्व युरोपमध्ये सीमेवर ट्रकसारख्या अवजड वाहनांची तपासणी करण्यासाठी केला जात आहे. याच्या मदतीने एका ट्रकमध्ये दडवून ठेवलेल्या सुमारे ७६ हजार महागड्या अवैध सिगारेट्स पकडण्यात यंत्रणेला यश आले.

प्रत्येक वस्तू पाहू शकते
कंपनीनेआपल्या वेबसाइटवर इरिया डिव्हाइस हा विमानांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण माध्यम ठरू शकत असल्याचा दावा केला आहे. हे स्कॅनर छोट्या तसेच मध्यम आकाराच्या विमानांची सहजरीत्या तपासणी करू शकते. त्यामुळे डिव्हाइस हे काम करू शकते. कंपनीचे म्हणणे असे की, प्रवाशांच्या सामानाची तपासणी त्यांना उतरवल्यानंतरच केली जाते. त्यामुळे िकरणोत्सर्गाचा परिणाम होणार नाही.

हे स्कॅनर ऑपरेट करण्यासाठी एका ट्रकसह ऑपरेटर रोबोटिक आर्म एक्सरे जनरेटरची आवश्यकता असते. स्कॅन करण्यापूर्वी विमान या डिव्हाइसच्या रोबोटिक आर्मखाली आणले जाते. विमानाच्या पुढच्या चाकात केबल लावून त्यानंतर ऑपरेटरला एक्सरेच्या माध्यमातून विमानातील प्रत्येक वस्तू पाहता येऊ शकते. हे स्कॅनर इतके अचूक आणि सूक्ष्म आहे की विमानाच्या सीटखाली टाचणी जरी लपवून ठेवली, तर तीही स्कॅन होते.
बातम्या आणखी आहेत...