आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल गेमच्या सोप्या तंत्रज्ञानात अब्जावधींचा खजिना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेव ग्रॉसमैन- गेल्या वर्षी अॅपलच्या अॅपस्टोरवर एक लाख नवीन आय फोन आणि आय पॅड अपलोड केले जातील. यात समाविष्ट आहे, पजल गेम्स, स्ट्रेटेजी गेम्स, शूट गेम्स, स्पाेर्ट‌्स गेम्स, वार गेम्स, वर्ड गेम्स आणि क्विज. काही चांगले, काही खराब आणि सर्वाधिक भंगार होते. सर्वाधिक गेमवर कुणी लक्ष दिले नाही. त्यांची विक्री साधारण होती. तरीसुध्दा लोक त्यांना का बनवतात? यासाठी की मोबाईल गेम बनवणे अपेक्षेनुसार सोपे आणि कमी खर्चीक आहे.यशस्वी गेमव्दारे भरघोस कमाई होते.

याचे प्रामाणिक उदाहरण फ्लॅपी बर्ड हे आहे.या साध्या गेममध्ये एक छोटा हिरव्या रंगाचा पक्षी मोठ्या पाईपमधून धक्का न लागता उडण्याचा प्रयत्न करत असते. फ्लॅपी बर्डची निर्मिती हनोईच्या २८ वर्षीय डोंग नग्युयेनने २०१३ मध्ये केली होती. तो पाच कोटी वेळा डाउनलोड केला गेला आहे. तो जवळपास ३२ लाख रूपये प्रतिदिन कमावत होता. नग्युयेनने गेम बंद केला कारणस तो गेमच्या यशस्वीतेच्या दबावाला सामोरा जाऊ शकला नाही.

काही गेम त्यापेक्षाही अधिक यशस्वी आहेत.अॅप डाटा साइट थिंक गेमिंगच्या म्हणण्यानुसार पजल गेम कँडी क्रश सागा सरासरी दरदिवशी पाच कोटी ९० लाख रुपये कमाई करतो. स्ट्रेटेजीक गेम क्लॅश ऑफ क्लॅन्सची कमाई प्रतिदिन नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. गेम बनवणारी फिनलँडची कंपनी सुपरसेलचे मुल्य ३२० अब्ज रुपयांपेक्षा अधिक आहे. हे आकडे फक्त अॅपल स्टोरचे आहेत. गुगल प्ले, अमेजन अॅप स्टोर आणि विंडोज फोन स्टोरचे आकडे यात समाविष्ट नाहीत. गेल्या वर्षी मोबाइल गेमव्दारे ग्लोबल कमाई १६०० अब्ज रुपये होती. ही २०१३च्या तुलनेत ४२ टक्के अधिक आहे.

यावर्षी मोबाईल गेमची कमाई १९०० अब्जांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. ते पहिल्यांदाच कंसोल गेम एक्स बॉक्स, प्ले स्टेशनला मागे टाकू शकतात. तसे, मोबाईल गेम जुन्या पीढीच्या कंसोल गेमपेक्षा वेगळे आहेत. काल ऑफ ड्यूटी किंवा असेसिन्स क्रीड सारख्या धमाकेदार कंसोल गेमच्या निर्मितीचे डझनावारी लोक अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. त्याचे बजेट ६०० कोटी रुपयापेक्षा अधिक आहे. मात्र, मोबाईल गेम कमी किचकट आहेत. तुम्ही त्याची निर्मिती कमी खर्चीत तुमच्या बेडरुममध्ये करू शकतात. डूडल जंपला दोघे भाऊ आणि मार्को पुसेनजकने २००९मध्ये तीन महिन्यात बनवले होते. हा सर्वाधिक डाउनलोड केलेलेे तिसरे अॅप आहे. टाइनी विंग्सला एक जर्मन प्रोग्रामरने बनवले होते. ते ८८ देशांत एक नंबर होते.

बातम्या आणखी आहेत...