आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : वर्ल्ड रेकॉर्ड बनवण्यासाठी मॉडेलने 18 इंचापर्यंत कमी केली कंबर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्लंडची मॉडेल रोमानी स्मिथ. - Divya Marathi
इंग्लंडची मॉडेल रोमानी स्मिथ.
फोटोत दिसणारी इंग्लंडच्या कोलचेस्टर येथील 20 वर्षीय मॉडेल रोमानी स्मिथ हिला जास्तीत जास्त बारीक कंबर करण्याचे वेड लागले आहे. त्यासाठी तिने शरिराचाही विचार केलेला नाही. तिने दिवसभरात सहा तासापेक्षा अधिक काळ कोर्सेट घातलेला असतो. विशेष म्हणजे त्यामुळे फुफ्फुसांसह तिच्या शरिरातील इतर अवयवांना इजा होण्याची शक्यता असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या तंत्राद्वारे तिला 18 इंचाची कंबर बनवण्यात यश आले आहे. पण हा आकार 15 इंचापर्यंत नेऊन विश्वविक्रम करण्याच्या तयारीत ती आहे.

गेल्या 18 महिन्यांमध्ये रोमानीने तिची कंबर तीन इंचांनी कमी केली आहे. आता तर ती कोर्सेट घालण्याचा वेळ सहा तासापेक्षा जास्त करण्याच्या विचारात आहे. रोमानी म्हणजे, मला कंबरेचा घेर 15 इंचापर्यंत आणायचा आहे. त्याचा परिणाम काय होईल ते मला माहिती नाही. पण मला तसे करायचे आहे. त्याचा परिमाण मला पाहायचा आहे. रोमानी तीन प्रकारच्या सहा कोर्सेटचा वापर करते. त्यात स्टील, लेदर आणि रबराच्या कोर्सेटचा समावेश आहे.

डॉक्टरांच्या चेतावणीबाबत रोमानिया म्हणते की, 'कोर्सेटचा वापर दिवसभर करणे धोकादायक ठरू शकरे याची मला जाणीव आहे. त्यामुळे हाडे आणि फुफ्फुसाला इजा पोहचू शकते. पण कमी वेळासाठी त्याचा वापर करणे फार धोकादायक नाही, असे तिचे म्हणणे आहे. यासाठी तिच्यावर अनेकदा मोठ्या प्रमाणावर टीकाही झाली आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, रोमानी स्मिथ हिचे काही PHOTOS