इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकन फोटोजर्नालिस्ट लिन्से एडेरियोने सौदी अरेबियाच्या महिलांचे असे काही फोटो सादर केले आहेत की, त्यामुळे आपले विचार एकदम बदलतील. युद्ध, मायग्रेशन आणि मानवी अधिकाराशी संबंधित कवरेज करणा-या लिन्सेने सौदीत सुमारे 12 वर्षे काम केले आहे. तेथे त्यांनी अनेक बंधने असतानाही काळानुसार बदलल्या महिलांचे जीवन आपल्या कॅमे-यात टिपण्याचा प्रयत्न केला. जास्त स्वतंत्र आणि मॉडर्न दिसल्या महिला...
- फोटोजमधील या महिला फक्त जास्त स्वतंत्रच नव्हे तर मॉडर्नही झाल्याचे दिसून येते.
- एडेरियाच्या माहितीनुसार, हे फोटोज येथील महिलांची सद्यस्थिती व त्यांचे जीवन दाखविण्यासाठी पुरेसे आहेत.
- तिने आशावाद व्यक्त केला की, जगभरातील लोक आता सौदीला एका वेगळ्या व चांगल्या नजरेने पाहतील.
- एडेरिया सांगते की, मला येथील काही ठिकाणे भावली किंवा मनाला स्पर्श करून गेली की त्याचे फोटो टिपणेही मला कठिण जात होते.
- ती म्हणते की, मी प्रत्येक वेळी सौदीत जाताना घाबरायचे की तेथे मला फोटो काढणे किती अवघड असेल.
- पण माझ्यासाठी हा एक प्रवास नव्हता तर आयुष्यातील एक रोमांचिक अनुभव राहिला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एडेरियाला तेथील महिलांच्या आयुष्यात काय बदल दिसला.....