आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोझांबिकनंतर साऊथ आफ्रिकेला पोहोचले मोदी, 10 हजार भारतीयांसमोर करणार भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औपचारिक स्वागतानंतर मोदींनी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांची भेट घेतली. - Divya Marathi
औपचारिक स्वागतानंतर मोदींनी राष्ट्राध्यक्ष जेकब जुमा यांची भेट घेतली.
प्रिटोरिया - पंतप्रधान नरेंद्र मोदी चार आफ्रिकन देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात साऊथ आफ्रिकेला पोहोचले आहेत. परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी मोदी प्रिटोरिया येथे पोहोचल्यानंतर ट्विट केले आहे - 'इतिहासच्या पाऊल खुनांवर' (In the footsteps of history). उभय देशांतील व्यापारी संबंध मजबूत करण्यासाठी मोदी दोन्ही देशांच्या उद्योजकांसोबत ते बैठक करणार आहेत. त्यासोबतच ते त्या ऐतिहासिक रेल्वेत बसणार आहे ज्या रेल्वेतून 1893 मध्ये मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधींना धक्के मारून बाहेर काढण्यात आले होते.

भारत - दक्षिण आफ्रिका यांचे संयुक्त निवेदन

काय म्हणाले मोदी
> महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली वाहाण्याची संधी आहे.
> दक्षिण आफ्रिक आणि भारताचे संबंध फार मजबूत आहेत. आफ्रिकेसोबत व्हिसा नियमांमध्ये शिथिलता आणली जाणार.
> या प्रवासात मला घरी आल्यासारखे वाटत आहे.
- विकास स्वरुप यांनी सांगितले, की साऊथ आफ्रिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री निकोआना मशाबाने आणि लघु उद्योग मंत्री लिंदिवे जुलू यांनी मोदींचे स्वागत केले.
- औपचारिक स्वागतानंतर मोदींनी राष्ट्राध्यक्ष जेकब जुबा यांची भेट घेतली.
- त्याआधी मोदींनी म्हटले होते, की दोन्ही देशांमध्ये आर्थिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने उद्योजकांसोबत बैठक घेतली जाईल.
- आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्यात मोदी डर्बन ते पीटरसेरित्झबर्ग हा प्रवास रेल्वेने करणार आहेत. पीटरमेरित्झबर्ग हे ते स्टेशन आहे जिथे 1893 मध्ये महात्मा गांधींना ब्लॅक इंडियन म्हणत रेल्वेतून उतरवून देण्यात आले होते.
- त्यानंतर मोदी टांझानिया आणि केनिया येथे जातील.

मोदींच्या आफ्रिकी देशांचा दौराचा मुख्य उद्देश
मोदींच्या दौऱ्यात हायड्रोकार्बन, सागरी सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, कृषी आणि खाद्य क्षेत्रात आफ्रिकन देशांशी सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, प्रिटोरियात कसे झाले मोदींचे स्वागत
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...