आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टॉप CEOs ला म्हणाले मोदी- फेसबुक-ट्विटर-इंस्टाग्राम आमचे नवे शेजारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅनजोस - सिलिकॉन व्हॅलीच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (स्थानिक वेळेनुसार शनिवार सायंकाळ) येथे जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंना संबोधित केले. पंतप्रधान म्हणाले, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर हे आता आमचे नवे शेजारी झाले आहेत.
ट्विटरमुळे प्रत्येकजण पत्रकार झाला आहे. गुगलने शिक्षकांना पत्रकार केले आहे. या सोशल मीडियाने जगाला प्रभावित केले असल्याचे पंतप्रधान म्हणाले. गुगल, फेसबुकच्या सीईओंसमोर बालताना मोदींनी युवकांमध्ये सध्या कशाची चर्चा असती हे देखील सांगितले. ते म्हणाले, अँड्रॉइड, आयओएस आणि विंडोज यापैकी कशाची निवड करावी हा युवकांमधील सध्याचा चर्चेचा मुख्य मुद्दा असतो. आता लोक जागत किंवा झोपत नाहीत तर ऑनलाइन आणि ऑफलाइन होतात, असे सांगत त्यांनी सोशल मीडियाच्या भाषेत आपले म्हणणे मांडले.

भारत सरकार सोशल मीडियाच्या अधिकाधिक वापरासाठी कोणत्या उपाययोजना करत आहेत, याबद्दल मोदींनी सांगितले, आम्ही पाचशे रेल्वेस्टेशन गुगलच्या मदतीने वायफाय करण्याचा प्रयत्न करत आहोत. सोशल मीडियाने सामाजिक भेदभाव कमी झाल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान म्हणाले, हे माध्यम धार्मिक आणि सामाजिक ओळख मानत नाही तर, मानवी मुल्यांच्या आधारे एकमेकांना जोडते. एक अब्ज सेलफोन असलेल्या देशात आम्ही एम गव्हर्नंसला प्रोत्साहन देत असल्याचे मोदींनी सांगितले.