आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi, Ambani And Pichai Are In The Race Of Time Person Of The Year

TIME पर्सन ऑफ द ईअरच्या रेसमध्ये मोदी, अंबानी, पिचाई आणि बगदादीही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - टाइम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इअर 2015 बनण्याच्या स्पर्धेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, रिलायन्स इंजस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचाही समावेश आहे. या यादीत जागतिक कंपन्यांचे सीईओ, नेते आणि कलाकारांसह एकूण 58 दावेदार आहेत.

विशेष म्हणजे एकिकडे या यादीमध्ये मोदींबरोबरच बराक ओबामा आणि शी जिनपिंग यांच्या नावाचा समावेश आहे. पण त्याचवेळी ISIS चा प्रमुख अबू बकर अल बगदादी हाही यादीत आहे. टाइम मॅगझिनने त्यांच्या पर्सन ऑफ द इअरच्या दावेदारांच्या यादीमध्ये चांगल्या किंवा वाईट कारणांसाठी वर्षभर चर्चेत असणाऱ्यांचा समावेश असतो. त्यामुळे बगदादीही या यादीत आहे.
रिडर्स पोल
>आतापर्यंत नरेंद्र मोदींना 1.3 टक्के मते मिळाली आहेत. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि सुंदर पिचाई यांनाही तेवढीच मते आहेत.
>मुकेश अंबानींना आतापर्यंत 0.2 टक्के मते मिळाली आहेत.
> रिडर्स पोल 4 डिसेंबरपर्यंत सुरू असेल. म्हणजे वाचकांना 4 डिसेंबरपर्यंत मते नोंदवता येणार आहेत. यादीची घोषणा 7 डिसेंबरला केली जाणार आहे.
> एडिटर्स पोलच्या यादीची घोषणा 9 डिसेंबरला होईल.

मॅगझिनमध्ये कोणाबाबत काय म्हटले?
1. नरेंद्र मोदी - जगातिल सर्वात मोठ्या लोकशाहीचे नेते. देश मॉडर्न बनवण्याचा प्रयत्न. भारतात एफडीआयसाठी प्रयत्न. हिंदु कट्टरतावादामुळे वादातही अडकले.
2. मुकेश अंबानी - भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती. रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन. रिलायन्स इंडस्ट्रीजकडे टेलिकॉम ते जगातील सर्वात मोठ्या आइल रिफायनरीही आहे.
3. सुंदर पिचाई - सुमारे 11 वर्षे गुगलमध्ये काम केल्यानंकप लॅरी पेज यांचा उजवा हात मानले जाणारे पिचाई यांना सीईओ बनवण्यात आले.
गेल्यावर्षीही मोदी होते स्पर्धेत
मोदी गेल्यावर्षीही टाइम मॅगझिनच्या पर्सन ऑफ द इअरच्या स्पर्धेत होते. मात्र एडिटर्सनी त्यांची निवड केली नाही. वाचकांनी मात्र त्यांनाच निवडले होते. 50 लाखांपैकी सुमारे 16 टक्के मते त्यांना मिळाली होती.
यादीत यांचीही नावे...
> अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
> फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद
> चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग
> अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन
> नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफझई
> इलेक्ट्रॉनिक कार बनवणारी कंपनी टेस्लाचे हेड अॅलॉन मुश्क
> अॅपलचे सीईओल टिम कूक
> पोप फ्रान्सिस