आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे पाश्चिमात्यांवर टीकास्त्र, रशियावर एकतर्फी निर्बंध लादली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
िब्रक्स परिषदेत उफामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. - Divya Marathi
िब्रक्स परिषदेत उफामध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
उफा (रशिया) - ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रशियाची बाजू घेत एकतर्फी निर्बंध लादणा-या अमेरिका व इतर पाश्चिमात्य राष्ट्रांवर अप्रत्यक्ष टीका केली. युक्रेनशी असलेल्या वादानंतर केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर या देशांनी रशियावर एकतर्फी निर्बंध लादलेले आहेत.
ब्रिक्स सदस्य देशांनी आपसांत सहकार्य वाढीस लागावे म्हणून प्रयत्न करण्याची गरज मोदींनी प्रतिपादीत केली. दुसरीकडे चीनलाही दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले. दहशतवाद्यांचा कोणता गट आहे, कुणाविरुद्ध तो लढतो आहे, त्यांना पाठबळ कोण देतो आहे याचा विचार न करता ही लढाई लढण्याचे आवाहन त्यांनी केले.

केवळ ब्रिक्स राष्ट्रांनीच नव्हे, तर संयुक्त राष्ट्रसंघातही या राष्ट्रांनी दहशतवादाबद्दल अशीच भूमिका घ्यायला हवी, असे मोदी म्हणाले. मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड जकी-उर-रहेमान लख्वी याच्या अटकेसंदर्भात भारताने मांडलेल्या प्रस्तावाला चीनने व्हेटो वापरून संयुक्त राष्ट्रसंघात विरोध केला होता. भारताने लख्वीविरुद्ध पुरावे दिले नसल्याचे कारण चीनने पुढे केले होते. चीनच्या या भूमिकेवर भारताने तत्काळ नाराजी व्यक्त केली होती.

गरिबी, कार्बन उत्सर्जन गंभीर समस्या
आज आपल्यासमोर गरिबी निर्मूलन हा प्रमुख अजेंडा असायला हवा. संयुक्त राष्ट्रसंघासमोरही हाच मुख्य मुद्दा आहे. याशिवाय कार्बन उत्सर्जन ही पण मोठी समस्या आहे. या समस्येवर एकत्रितपणे तोडगा काढायला हवा, असे मोदी म्हणाले. दरवर्षी ब्रिक्स व्यापार मेळा भरवण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

क्रीडा परिषदेचा मांडला प्रस्ताव
ब्रिक्स देशांत क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सहकार्य वाढीस लागावे म्हणून ब्रिक्स स्पोर्टस् कौन्सिल स्थापन करण्याचा प्रस्ताव मोदींनी मांडला. या अंतर्गत फुटबॉलसारख्या स्पर्धा अायोजित करण्यात यजमान म्हणून भारत पुढाकार घेईल, अशी हमी त्यांनी दिली. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण अाफ्रिका या ब्रिक्स देशांत फुटबॉल हा सर्वांत लोकप्रिय खेळ असल्याचे मोदी म्हणाले.