आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Government Of Regarding Specific Corruption Roles

आधी मुलाने २५०, मुलीने ५००, जावयाने हजार कोटी कमावल्याची चर्चा होती: मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सॅन होजेतील सॅप सेंटरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करताना आपल्या सरकारच्या उपलब्धींचा पाढा वाचला. त्याचवेळी मोदींनी भ्रष्टाचाराबाबत आपली व सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. त्यांनी काँग्रेसवर थेट टीका केली नाही मात्र बोलता बोलता जावयाचा उल्लेख केला. ‘आधी मुलाने २५० कोटी जमवले, मुलीने ५०० कोटी जमवले... जावयाने १००० कोटी जमवल्याचीच चर्चा व्हायची,’ असे मोदी म्हणाले. जावयाच्या उल्लेखाने प्रेक्षकांना हसू आवरता आले नाही.
मोदींच्या वक्तव्यावर काँग्रेस भडकली. परदेशात मोदींनी देशाचा अपमान केला. ते जातात तेथे दिले जाणारे ‘मोदी- मोदी’चे नारे प्रायोजित आहेत,असे काँग्रेस प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले.

एक वर्षात तिसऱ्यांदा भेटले मोदी-ओबामा
-नरेंद्र मोदी आणि बराक ओबामांची न्यूयॉर्कमध्ये भेट झाली. मोदी येताच ओबामांनी त्यांना आलिंगन दिले. एक वर्षातील त्यांची ही तिसरी भेट आहे.

-मोदी म्हणाले- जलवायू, सुरक्षा परिषद, आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली. मी बराकला स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंब्यासाठी धन्यवाद दिले. ही भेट २१ व्या शतकाची दिशा स्पष्ट करेल.

-दहशतवादाविरुद्धचा लढा आणखी तीव्र करून मुंबई हल्ल्याच्या आरोपींना शिक्षा करण्यास पाकला सांगण्यावर सहमती झाल्याचे मोदी म्हणाले.

नोव्हेंबरमध्ये ६ देशांचा दौरा
१२ नोव्हेंबरला मोदी इंग्लंडला जातील. तेथे भारतीयांना भेटतील. ७० हजार प्रेक्षक क्षमतेच्या वेंब्ले स्टेडियममध्ये भाषण देतील. १५ व १६ नोव्हेंबरला तुर्कस्तान व २१-२२ ला मलेशियात जातील. शिवाय इस्रायल, फिलिपाइन्स, सिंगापूरचाही दौरा नियोजित आहे.

पाक-अमेरिकी मीडिया
पंतप्रधान मोदींचे स्टार स्वागत, शरीफ काय करत आहेत?
मोदी हे हुशार राजकारणी आहेत. त्यांना प्रभाव टाकता येतो. मोदींचे स्टारसारखे स्वागत होत आहे. परंतु नवाज शरीफांना संयुक्त राष्ट्र प्लॅटफार्मशिवाय दुसरे काहीच दिसत नाही. नवाज काय करत आहेत? पाककडे जगाला देण्यासारखे काहीच नाही.पाक व शरीफांनी मोदींकडून शिकावे.- द नेशन (संपादकीय)

अमेरिकेला वाटते भारताच्या रूपाने एक नवाच चीन गवसला
गुगल, फेसबुक व ट्विटरसारख्या अमेरिकी तंत्र कंपन्या चीनच्या इंटरनेट धोरणामुळे तेथे ब्लॉक आहेत. यामुळे टॉपच्या कंपन्यांना जगात "नव्या चीन'चा शोध आहे. भारत त्यासाठी पर्याय वाटतो आहे. ५०%हून अधिक तरुण, वेगाने लोकप्रिय होणारे इंटरनेट यामुळे भारत ‘बेस्ट मार्केट’ ठरतो.- न्यूयॉर्क टाइम्स (संपादकीय)