क्वालालंपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांनी सोमवारी मलेशियाच्या ब्रिकफील्डमध्ये तोरणद्वाराचे लोकार्पण केले. वास्तुशिल्पकार क्षितिज जैन यांच्या कल्पनेतून ते साकारले.
- ७३.९५ लाख (११ लाख डॉलर) या तोरणद्वाराच्या बांधकामावर खर्च.
- २० लाख भारत वंशाचे लोक मलेशियाच्या ३ कोटी लोकसंख्येत.
मलेशियामध्ये लिटल इंडिया
- मलेशियात लिटल इंडिया प्रकल्प सुरू केल्याचे प्रतीक म्हणून भारतार्फे हे तोरणद्वार मलेशियाला भेट देण्यात आले.
- सांचीच्या स्तुपाच्या तोरणद्वारावरील बौद्धकलेचा प्रभाव आहे. त्यावर प्राचीन भारतीय व इस्लामी कलाकुसरही आहे.
दोन राष्ट्रांमधील सेतू
‘‘हे तोरणद्वार केवळ दगडाच्या तुकड्यावरील कलाकृती असली तरी दोन राष्ट्रांमधील सेतू आणि दोन महान संस्कृतिचे प्रतीक आहे.’’
नरेंद्र मोदी, पंतप्रधान
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या लोकार्पण सोहळयाचे फोटो..