आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#ModiInUS : मोदींचा पाकवर हल्ला, म्हणाले UN ने ठरवावी दहशतवादाची व्याख्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोस (कॅलिफोर्निया) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिलिकॉन व्हॅलीतील दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये सॅप सेंटर येथे पोहोचले. याठिकाणी मोदी इंडियन अमेरिकन पाहुण्यांच्या उपस्थितीतभाषण करत आहेत. शहीद भगतसिंग यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या स्मृतीला उजाळा देत मोदींनी भाषणाचा सुरुवात केली. सध्या ब्रेन ड्रेन नव्हे तर ब्रेन गेनची संधी असल्याचे मोदी म्हणाले. भारताची भूमी तुम्हाला बोलवत आहे असे आव्हानही मोदींनी केले. त्यापूर्वी प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी सॅप सेंटरमध्ये सादरी करण केले. सिलिकॉन व्हॅलीमध्ये भारतीय वंशाचे सुमारे पाच लाख लोक राहतात.

UPDATES...

8.46AM: तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी मी तुमचा आभारी आहे. माझ्याबरोबर म्हणा, भारत माता की...जय. आवाज भारतापर्यंत पोहोचयला हवा. बीर भगत सिंग अमर रहे, खूप खूप धन्यवाद.
------------------
8.44AM: गुड टेररिझम आणि बॅड टेररिझम सुरू आहे. दहशतवाद हा दहशतवाद असतो. आम्ही जगाला ते सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. पण आमच्यावरच प्रश्नचिन्हं उपस्थित केले जात आहेत. दहशतवाद जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊ शकतो. दहशतवादाचे चित्र स्पष्ट असावे ही जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची आहे. मी गांधी आणि बुद्धांच्या भूमीतून आलो आहे. मी ठामपणे यूएनमध्ये म्हणणे मांडले आहे.
------------------
8.40AM: देश विकासाच्या शिखराकडे जात आहे, याचा अंदाज तुम्हाला आला असेल. दहशतवाद आणि ग्लोबल वॉर्मिंग ही दोन नवी आव्हाने आहेत. पण मानवतेवर विश्वास असल्यास या दोन्हींचा सहज सामना करता येऊ शकतो. यूएनला अद्याप दहशतवाद समजलेला नाही. असे झाल्यास दहशतवाद संपायला किती वर्षे लागतील. मी जगातील सर्व देशांना दहशतवाद संपवण्यासाठी एकत्र येण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे.
------------------
8.38AM: आम्ही एवढा विकास केला आहे की रोज दोन दोन तास बोललो तरी 15 दिवस लागतील. त्यामुळे आज केवळ ट्रेलर दाखवून जात आहे.
------------------
8.36AM: जॅम योजनेमुळे करप्शन कमी झाले. कितीही मिळाले तरी सोडायचे नाही, हा मनुष्य स्वभाव आहे. पण 30 लाख लोकांनी सबसीडी सरेंडर केली हे मी अभिमानाने सांगतो. आजच्या काळात 30 लाख लोकांनी सबसिडी सोडावी ही छोटी बाब नाही. त्याच शक्तीच्या जोरावर भारत भारत पुढे जाणार आहे. तरुणांसाठी स्किल डेव्हलपमेंट भारताचे भविष्य घडवेल.
------------------
8.32AM: दूसरे आहे A. आधार कार्ड. एकच व्यक्ती दहा ठिकामांहून वेगवेगळ्या नावाने पैसे घेतो. तिसरे आहे M. मोबाईल करप्शन दूर करायचे आहे. आमच्या देशात घरांमध्ये गॅस सिलेंडरसाठी सबसिडी दिली जाते. श्रीमंत गरीब सर्वांना ही सबसिडी मिळते. पण ती सबसीडजी आधार कार्डाद्वारे द्यावी असे आम्ही ठरवले आहे. जन धन अकाऊंटमध्ये थेट पैसे जातील. आधी सुमारे 19 कोटी नागरिकांना गॅस सिलेंडर दिले जात होते. सराकारी तिजोरीतून तेवढ्या लोकांना सबसिडी दिली जायची. आधार कार्डशी जोडल्याने हा आकडा 13 कोटींवर आला. मग मधले 5 कोटी कुठे गेले. जुन्या दरांनुसार 19000 कोटी रुपयांची चोरी व्हायची. तो सर्व पैसा तिजोरीतच पाहिला. दलाल बेपत्ता झाले.
------------------
8.29AM: आमचे मिशन JAM आहे. जॅम ऑफ ऑल. मी जेव्हा जॅमच्या थेअरीबाबत बोलतो तेव्हा जे चा अर्थ असतो जन धन बँक अकाऊंट. तुमच्यापैकी जे माझ्या पिढीतील असतील त्यांना माहिती असेल की, येथे 69 मध्ये बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. बँक केवळ श्रीमंतांच्या कामी येतात गरीबांच्या नाही, असे म्हटले गेले. सरकारने सर्व बँक ताब्यात घेतल्या. पण मी दिल्लीत आलो तेव्हा कळले की देशातील अर्ध्या लोकांनी अद्याप बँक पाहिलेलीच नाही. आम्ही 100 दिवसांत सर्वांचे बँक खाते खोलण्याचे आव्हान स्वीकारले. 18 कोटी नवे बँक खाते सुरू केले. पंतप्रधान जन धन खाते झीरो बॅलेंन्स ने सुरू करण्याचा नियम आम्ही केला. स्टेशनरीचा खर्च बँकेला द्यायला सांगितला. आम्ही 40 वर्षे खूप मज्जा केली. आता आम्हाला घाम गाळावा लागणार आहे. मी गरीबांची श्रीमंती पाहिली आहे. श्रीमंतांची गरीबी तर आम्ही जाणतो पण गरीब जेव्हा श्रीमंती दाखवतात तेव्हा छाती अभिमानाने फुलून येते. सरकारने झीरो बॅलेंन्सने अकाऊंट सुरू करा असे सांगितले. पण गरीबांनी 32000 कोटी रुपये बँकेत जमा केले. तेही 50-100 रुपये वाचवून.
------------------
8.23AM: मी दिल्लीमध्ये आलो तर स्पेट टेक्नॉलॉजीचा वापर वाढला. आज आमच्याकडे 170 विभाग असे आहेत ज्याठिकाणी स्पेस टेक्नॉलॉजीचा वापर होत आहे. ज्या प्रकारे टेक्नॉलॉजीद्वारेपूर्ण जगाला नवी शक्ती दिली त्यामुळे नवी दिशा मिळाली आहे. त्यामुले आम्ही डिजीटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे.
------------------
8.20AM: उपनिषदापासून भारताच्या उपग्रहाची चर्चा सुरू झाली आहे. संपूर्ण विश्वास भारत पहिला असा देश आहे जो पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचला. कारण ही संकल्पाची शक्ती आहे. आज अगदी मच्छीमारांनाही या टेक्नॉलॉजीचा फायदा होतो.
------------------
8.16AM: काही काळापूर्वी ब्रिक्स संकल्पना आली होती. त्यांचे म्हणणे होते की, आगामी काळात वेगाने विकसित होतील असे पाच देश आहेत. ब्राजील, रशिया, इंडिया, चीन आणि साऊथ अफ्रीका। गेल्या काही वर्षांत ब्रिक्समध्ये भारताचा I जगाला कमीच दिसत होता. पण आज आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे आहोत. 15 महिन्यांमध्ये विकासाकडे वेगाने वाटचाल सुरू केल्याने भारत ब्रिक्समध्ये शक्तीशाली बनून समोर आला असल्याचे समोर आले आहे.
------------------
8.14AM: लोक विचारतात की, देश पुढे कसा जाणार, एवढा आत्मविश्वास कुठून येतो. पण मला विश्वास आहे. विश्वास आहे कारण माझा देश तरुण आहे. 65 जनता 35 पेक्षा कमी वयाची आहे. आता हा देश मागे राहू शकत नाही.
-----------------
8.11AM: काही वेळातच नेत्यांवर आरोप होत असतात. मुलाने 250 कोटी कमावले, मुलीने 500 कोटी कमावले, जावयाने 1000 कोटी कमावले. मावस भाऊ, चुलत भाऊ यांनी कोट्यवधी कमावले, असे आरोप होतात. यामुळे भ्रष्टाचार वाढला, राग वाढला. पण आज मी तुमच्यामध्ये उभा आहे. माझ्यावर कधी आरोप लागला. आम्ही जगतोही देशासाठी आणि प्राणही देऊ तो देशासाठीच.
------------------
8.09 AM: मोदीने काय केले आणि मोदी काय करत आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तुम्हाला आठवत असेल मी म्हटलो होतो मेहनत करण्याच मागेपुढे पाहणाप नाही. प्रत्येक क्षणाचा मी सदुपयोग करेल. आज 16 महीन्यांनंतर मला तुमचे सर्टिफिकेट हवे आहे. त्यांनी उपस्थितांना काही प्रश्न केले. मी आश्वासन पाळले, परिश्रम केले की नाही. देशासाठी झगडतोय की नाही, तुम्ही दिलेली जबाबदारी योग्यपणे सांभाळतोय की नाही, असे सवाल मोदींनी उपस्थितांना केले.
------------------
8.06 AM: एकेकाळी भारत जगाला जोडला जाण्यासाठी अथक परिश्रम करायचा. प्रत्येकाने आपल्या परिने प्रयत्न केले. आज वेळ अशा प्रकारे बदलली आहे की, जगाला भारताबरोबर जोडले जावे असे वाटते. यामुळेच बारत यसाचे शिखर गाठणार आहे. मी सरकारमध्ये आलो तेव्हा म्हटले होते टेक्नॉलॉजीपासून कोणीही दूर राहू शकत नाही. घटना घडली की लगेचच मोबाइलवर येते.
------------------
8.03 AM: गेल्या 20-25 वर्षांपासून चर्चा सुरू आहे. 21 वे शतक कोणाचे आहे. (उपस्थितांनी मोदी-मोदीच्या घोषणा सुरू केल्या) सगळ्यांना माहिती आहे की, 21 वे शतक हे आशियाचे आहे. पम गेल्या काही काळात लोक हे शतक आशियाचे नव्हे तर भारताचे आहे असे म्हटले जाऊ लागले आहे. जगालाही आज ते पटत आहे.
------------------
8.00AM: मला दिल्लीला येऊन 16 महीने झाले आहेत. रस्तेही माहिती नव्हते. पार्लामेंटच्या एखाद्या गल्लीत जाण्यासाठीही मदत घ्यावी लागायची. माझ्यासारख्या नव्या व्यक्तीच्या हातात देशवासियांनी जबाबदारी दिली. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने ती जबाबदारी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. आज जगातील कोणत्याही कोपऱ्यात जा, भारताकडे आशेच्या नजरेने पाहिले जात आहे.
------------------
8.00 AM: दिलीप सिंह सूद भारताचे पहिले काँग्रेसमॅन बनले. येथूनच बनले होते. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपूर्ण तारुण्य घालवले. महात्मा गांधींच्या आदर्शावर ते जीवन जगले. आणीबाणीच्या वेळी दुसरा स्वातंत्र्यलढा घडला. 1975 मध्ये नेत्यांना तुरुंगामध्ये टाकले गेले. त्यावेळी जयप्रकाश नारायण नेतृत्व करत होते. जेपी शिक्षणासाठी याच कॅलिफोर्नियात आले होते हे अनेकांना माहिती नाही. या भागाबरोबर आणचे अतूट नाते आहे.
------------------
7.56 AM: भारत स्वातंत्र्य व्हावा यासाठी कॅलिफोर्निया, वेस्ट कोस्टमध्ये वसलेले शीख भाऊ बहीण प्रयत्न करत होते. हे आमचे नाते आहे. 19 व्या शतकात शेतात काम करण्यासाठी आलेला शेतकरी गुलामीमुले बेचैन असायचा. तर आज आमचा तरुण गरीबीमुळे त्याच मानसिक अवस्थेत आहे.
------------------
7.53 AM: लोक म्हणाायचे, ब्रेन ड्रेन तांबले पाहिजे. काहीही करून हे ब्रेन ड्रेन थांबले पाहिले. आई भारती तर बहुरत्ना वसुंधरा आहे. तेथेतर एकापेक्षा एक वरचढ ब्रेन तयार होतात. हे ब्रेन ड्रेन ब्रेन गेनही बनू शकते.
------------------
7.50 AM: 25 वर्षांनंतर आलो आहे. भारताची व्हायब्रंट प्रतिमा कॅलिफोर्नियामध्ये अनुभवत आहेत. ज्यालाही भेटलो त्याच्या चेहऱ्यावर चमक आहे.
------------------
7.45 AM: मोदी म्हणाले, येथे 27 सप्टेंबर आहे तर भारतात 28 सप्टेंबर आहे. तेथे आज शहीद भगत सिंगांची जयंती साजरी केली जाईल. मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो.
------------------
7.43 AM: मोदींनी भाषणाची सुरुवात केली, गुड इव्हीनिंग कॅलिफोर्नियाने सुरुवात केली.
------------------
स्टेजवर पोहोचले पंतप्रधान नरेंद्र मोदी.
------------------
सॅप सेंटरमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधी, अधिकाऱ्यांची मोदींनी घेतली भेट.
------------------
काही वेळ सॅप सेंटरमध्ये भारतीय वंशाच्या लोकांसमोर भाषण करणार मोदी.
------------------
सूफी सिंगर कैलाश खेर यांचे सादरीकरण. कर रहे हैं परफॉर्म।
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS