आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही म्यानमारमध्ये कट्टरपंथीय हिंसाचारावर चिंतीत आहोत, मिळून काम करावे लागेल -मोदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपीतॉ - पीएम नरेंद्र मोदींनी बुधवारी म्यानमारच्या स्टेट काउंसलर आंग सान सू की यांची औपचारिक भेट घेतली. मोदी आणि सू की यांची ही पहिलीच द्विपक्षीय भेट होती. यानंतर संयुक्त संबोधनात मोदींनी रोहिंग्या मुस्लिमांचे नाव न घेता रॅखीन प्रांतात सुरू असलेल्या कट्टरपंथी हिंसाचारावर चिंता व्यक्त केली. ज्या आव्हानांचा तुम्ही सामना करत आहात, त्याची आम्हाला जाणीव आहे. साहजिकच लोकांवर थेट परिणाम होतो. सर्वांनी मिळून यावर तोडगा काढायला हवा. सर्वांसाठी शांतता, न्याय आणि लोकशाही यंत्रणा कायम राहील अशी आम्ही अपेक्षा करतो असेही मोदी म्हणाले आहेत. 
 
 
आणखी काय म्हणाले मोदी?
- नरेंद्र मोदी म्हणाले, "शेजारील राष्ट्र असल्याने आपले हित एकच आहे. रस्ते आणि पुलांचे बांधकाम आपल्या चांगल्या भवितव्याचे संकेत आहेत. भारतातून म्यानमारकडे हायस्पीड डीझल ट्रक येण्यास सुरुवात झाली आहे. आम्ही म्यानमारच्या आरोग्य क्षेत्रात सुद्धा हातभार लावत आहोत. भविष्यात आमचे प्रकल्प सुद्धा म्यानमारशी सुसंगत असणार आहेत. आज झालेल्या करारांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांना नवी भरारी मिळेल."
- "म्यानमारचे लोक भारतात येऊ इच्छित असल्यास त्यांना ग्रेटिस व्हीसा दिला जाईल."
- "भारतातील तुरुंगांमध्ये बंद असलेल्या म्यानमारच्या 40 कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ते लवकरच आपल्या कुटुंबियांची भेट घेऊ शकतील."
बातम्या आणखी आहेत...