आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षिण आफ्रिकेने मोहनदास यांना महात्मा घडवले, मोदींनी केला आफ्रिकी भूमीचा गौरव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिका ही सत्याग्रहाची भूमी आहे. याच भूमीने मोहनदास गांधी यांना महात्मा घडवले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आफिकन भूमीचा गौरव केला.

शुक्रवारी येथील भारतीयांसमोर बोलताना मोदींनी दोन्ही देशांदरम्यान असलेल्या ऐतिहासिक संबंधांचा उल्लेख करून आगामी काळात िवविध क्षेत्रांतील सहकार्यासाठी भारत कटिबद्ध असल्याची हमी दिली.

भारताच्या विकासाबद्दल बोलताना मोदी यांनी सध्याच्या विकासदराचा दाखला दिला. आगामी काळात देश ८ टक्के विकासदर नोंदवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताच्या या विकासाची व्याख्या ‘होप’, अर्थात हार्माेनी, ऑप्टिमिझम, पोटेन्शियल आणि एन्टरप्राईझ अशा शब्दांत करता येईल, असेही मोदी यांनी सांगितले. प्रारंभी समारंभस्थळी मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. यात आफ्रिकन संस्कृतीचे दर्शन घडले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...