आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Said That World Need To Work Together To Combat Terrorism

#ModiInMalaysia: मोदी म्हणाले, संपूर्ण जगाला धोका, एकिने लढावे लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाक. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाक.
क्वालालंपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाक यांच्याबरोबर अनेक करार केले. त्यापूर्वी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, जगात दहशतवादाचा धोका आहे. आपल्याचा त्याचा निपटारा करायला हवा. त्यापूर्वी रविवारी पंतप्रधान 10 व्या ईस्ट आशिया परिषदेत सहभागी झाले. त्यांनी भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित केले.

मोदींचा दौरा असा...
> सोमवारी मलेशियाच्या पंतप्रधानांबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली.
> मलेशियाच्या कंपन्यांच्या सीईओंना भेटणार.
> त्यानंतर पंतप्रधान सिंगापूरला रवाना होतील.
> सिंगापूरमध्येही भारतीय समुदायाच्या नागरिकांना संबोधित करणार.
> सिंगापूर आणि भारताच्या संबंधांना 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर दौरा महत्त्वाचा आहे.
> पंतप्रधान मोदींचा सिंगापूरमध्ये लेक्चरचा कार्यक्रम असेल.
> मोदी राष्ट्रपती टोनी टान केंग याम, पंतप्रधान ली सीएन लूंग यांनाही भेटतील.
> सिंगापूरच्या गुंतवणूकदारांना भेटतील, भारतातील गुंतवणुकीच्या संधींबाबत चर्चा होणार. ते सिंगापूरमध्येही भारतीय वंशाच्या लोकांना संबोधित करतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा, संबंधित PHOTOS