आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Says Old Structures Of Terrorism Were Still Being Used By Some Countries

अनेक देश दहशतवादाला धोरण म्‍हणून राबवत आहेत : नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिक्‍स बैठकीत श्रद्धांजली अर्पण करताना नेते. - Divya Marathi
ब्रिक्‍स बैठकीत श्रद्धांजली अर्पण करताना नेते.
अंकारा (तुर्कस्तान) - ''दहशतवादाचा वर्ण बदलत आहे. मात्र, अनेक देश दहशतवादाच्‍या जुन्‍याच संरचनेला आपले धोरण म्‍हणून राबवत आहेत, ” असे मत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्‍यक्‍त केले. रविवारी रात्री येथे झालेल्या ब्रिक्‍स नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते. ‘जी-20' परिषदेसाठी मोदी येथे आले आहेत.

नव्याने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थांवर लक्ष केंद्रीत करणे हा या बैठकीचा मुख्‍य उद्देश होता. मात्र, पॅरिसमध्‍ये झालेल्‍या दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर यामध्‍ये दहशतवादाच्‍याच समस्‍येवर चर्चा होताना दिसत आहे.
विदेशातील काळ्या धनाला गोठवण्‍याचा सल्‍ला
ज्‍या देशाचे काळेधन विदेशात पडलेले आहे ते गोठवून ते त्‍या त्‍या देशाला द्यावे, असा सल्‍ला या संमेलनामध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. ते म्‍हणाले, ''आयएमएफच्‍या कोटामध्‍ये तत्‍काळ बदल केला जावा. तसे झाल्‍यास भारतासारख्‍या विकसनशील देशाला अधिक अधिकार मिळतील.
मोदी यांनी नेमके काय म्‍हटले ?
* दहशतवादाच्‍या मुद्दयावर यूएनला महत्‍त्‍वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे. दहशतवादाकडून मानवतेला सर्वात मोठा धोका आहे.
* ज्‍या भागात दहशतवादांसोबत युद्ध सुरू आहे त्‍या भागापासून दूर असलेले शहरेसुद्धा सुरक्षित नाहीत. त्‍यांना याची मोठी किमत चुकवावी लागत आहे.
* दहशतवादाला धर्मापासून वेगळे ठेवावे लागणार आहे. दहशतवादाचे समर्थन करणा-यांमध्‍ये फूट पाडावी लागणार आहे.