आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

US: टॉप CEOsनी घेतली मोदींची भेट, भारतात गुंतवणार 3 वर्षात 3 लाख कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- अमेरिका दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी व्हाइट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेतली. गेल्या दोन वर्षांतील त्यांची ही सातवी भेट आहे. मोदींनी मंगळवारी रात्री यूएस-इंडिया बिझनेस काउंसिलमध्ये संबोधित केले.

पेप्सिकोच्या इंदिरा नूई, अमेजनचे जेफ बेजोस यांच्यासह अमेरिकेतील टॉप-25 CEOs यावेळी उपस्थित होते. याशिवाय 15 खासदार उपस्थित होते. जागतिक अर्थव्यवस्थेसाठी भारतीय अर्थव्यवस्थेचे योगदान किती महत्त्वपूर्ण आहे, हे मोदींनी अमेरिकन उद्योजकांना पटवून दिले.

भारत- अमेरिकेच्या भागीदारीचा उभय देशांना फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर भारतात उद्योग विकासासाठी अनुकूल वातावरण असून गुंतवणुकीची मोठी संधी आहे. तसेच बिझनेससाठी देखील सकारात्मक वातावरण असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले. अमेरिकन कंपन्या पुढील 3 वर्षात 45 अब्ज डॉलर अर्थात 3 लाख कोटी रुपये भारतात गुंतवणार असल्याचे ‍यूएस-इंडिया बिझनेस काउंसिलचे चेअरमन व Cisco चे एक्झिक्यूटिव्ह चेअरमन जॉन चेम्बर्स यांनी सांगितले.

मोदी म्हणाले - भारत केवळ बाजारपेठ नाही...
- मोदींची अमेरिकन CEOs सोबत राउंडटेबल मीटिंग झाली. यात भारत-अमेरिकाच्या भागिदारीवर चर्चा झाली.
- मोदी म्हणाले, भारत केवळ एक मोठी बाजारपेठ म्हणून राहिलेला नाही. जागतिक विकासाचे नवे इंजिन म्हणून भारत सज्ज आहे असे मोदींनी सांगितले.
- 'पंतप्रधान जनधन योजना' अंतर्गत 20 कोटी खाते उघडण्यात आले आहे. ही आकडेवारी जगातील बहुतेक देशांच्या लोकसंख्ये एवढी आहे.
- भारतात लोकशाही असून भाजप सरकारने देशात उद्योग अनुकूल धोरणे राबवले आहे. अमेरिकन उदयोजकांना आर्थिक सुधारणा कार्यक्रमांची माहिती मोदींनी यावेळी दिली.
- भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
- भारतात गुंतवणूक करुन उत्पादन कारखाने सुरु करण्याचे आवाहन मोदींनी अमेरिकन बिझनेसन्सना केले.

पुढील स्लाइडवर वाचा, या टॉप CEOs नी घेतली मोदींची भेट
बातम्या आणखी आहेत...