हांगझाऊ(चीन) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी(ता.चार) येथे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जिनपिंगशी अर्धातास चर्चा केली. पंतप्रधानांनी पाक व्याप्त काश्मीरमधून जाणा-या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर(सीपीईसी) चा मुद्दा उपस्थित केला. या व्यतिरिक्त अणु पुरवठा गटाचे(एनएसजी) भारताचे सदस्यत्व आणि दहशतवादासारख्या मुद्द्यांवरही चीन राष्ट्रपतींशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांची तीन महिन्यात ही दुसरी भेट आहे. जिनपिंग म्हणाले, भारतासोबत कठीण काळातही संबंध टिकून ठेवू. मोदी जी-20 परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनला आले आहेत. 5 सप्टेंबरला मोदी बराक ओबामा यांची भेट घेणार आहेत. मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली...
- चिनी सरकारी वृत्तसंस्था झिन्हुआने दिलेल्या वृत्तानुसार शी जिनपिंगने बैठकीत मोदी म्हटले, चीन भारतासोबत आपले संबंध टिकवण्यासाठी व सहकार्य वाढवण्यासाठी प्रयत्न करायला तयार आहे. हे संबंध खूप अडथळ्यांनंतर सुधारले आहेत.
- तीन महिन्यांमध्ये मोदी व शिनपिंग यांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी दोन नेत्यांमध्ये जून महिन्यात ताश्कंद येथील शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या(एससीओ) बैठकीत भेट झाली होती. पुढील भेट गोवात ब्रिक्स देशांच्या परिषदेत होणार आहे.
- मोदी म्हणाले, भारत किर्गिस्तानमधील चिनी राजदूत कार्यालयावर झालेला दहशतवादी हल्ल्याचे भारत निंदा करत आहे.
ब्रिक्स देशांच्या नेत्यांचीही घेतली भेट
- ब्रिक्स देशांच्या नेत्यांसोबत एक फोटोही मोदींनी काढला. यावेळी ते म्हणाले, मी तुम्हा सर्वांचा गोवात होत असलेल्या ब्रिक्स परिषदेसाठी स्वागत करीत आहे.
मोदींचा दौरा का आहे महत्त्वाचा?
- तीन महिन्यांत मोदींची जिनपिंगशी दुस-यांदा भेट झाली. मात्र दोन्ही देशांमध्ये ब-याच मुद्द्यांवरुन तणाव सुरु आहे.
- चीनला वाटते, की व्हिएतनाम आणि दक्षिण चिनी समुद्राबाबत मोदी आक्रमक आहेत.
चीन-भारत यांच्या अनेक मुद्द्यांवरुन तणाव
- मोदी व्हिएतनामवरुन थेट चीनला पोहोचले आहे. दक्षिण चिनी समुद्राच्या भांडणात भारत व्हिएतनामच्या बाजून आहे. चीनने यावरुन भारताला इशाराही दिला आहे.
- भारताने अरुणाचल प्रदेशात सुखोई आणि ब्रह्मोस तैनात केले आहेत. चीनला यावर आक्षेप आहे.
- भारत-अमेरिकेने संरक्षण क्षेत्रात आतापर्यंत सर्वात मोठा करार केला आहे. यामुळे चीन व पाकिस्तान चिंतित आहेत.
- भारत चीनकउे ट्रेड बॅलन्सची मागणी करत आला आहे. भारताची हिस्सा वाढवण्यावर चीन नेहमी गप्प राहिला आहे.
हांगझाऊमध्ये शुकशुकाट
- जी-20 परिषद हांगझाऊमध्ये होत आहे. जगातील प्रमुख नेते येणार असल्याने एक आठवड्यापूर्वी हे पर्यटनस्थळ बंद करण्यात आले आहे.
- 90 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरात सध्या रस्त्यांवर शुकशुकाट आहे. परिषदे संपेपर्यंत दुकाने खोली जाणार नाही.
व्हिएतनाममध्ये काय झाले?
नरेंद्र मोदी शुक्रवारी चीनला येण्यापूर्वी व्हिएतनामची राजधानी हॅनोईला पोहोचले. 15 वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिला व्हिएतनाम दौरा होता. 2001 मध्ये अटलबिहारी वाजपेयी हॅनोईला आले होते. मोदींनी व्हिएतनामला संरक्षणसाठी 50 कोटी डॉलर देण्याची घोषणा केली आहे. शनिवारी व्हिएतनामचे पंतप्रधान नगुएन जुआन फुकसोबत प्रतिनिधीत्व पातळीवर चर्चा केल्यानंतर मोदी बौध्द मंदिर कुआन सू पगोडा पोहोचले. ते म्हणाले, युध्दाने तुम्हाला जगापासून दूर ठेवले. बुध्दाने तुम्हाला भारताशी जोडले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, जी-20 म्हणजे काय?