आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएम मोदीजी, गुगलमध्ये तुमची प्रतीक्षा, पिचाईंचा व्हिडिओ मेसेज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुंदर पिचाई यांनी यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओचा स्नॅपशॉट - Divya Marathi
सुंदर पिचाई यांनी यूट्यूबवर पोस्ट केलेल्या व्हिडिओचा स्नॅपशॉट
न्यूयॉर्क- अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले. ते २७ तारखेला सिलिकॉन व्हॅलीत गुगल व फेसबुकच्या मुख्यालयांना भेट देतील. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यूट्यूबवर व्हिडिओ मेसेजद्वारे सिलिकॉन व्हॅलीत मोदींचे स्वागत केले. मेसेजमध्ये पिचाई म्हणतात, तुमची भेट घेण्यासाठी गुगलमध्ये प्रत्येक जण उत्सुक आहे.
मेसेजचा हा सारांश...
सिलिकॉन व्हॅलीत मोदींचे स्वागत करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल. गुगलचे कर्मचारी व येथे राहणाऱ्या भारतीयांत पंतप्रधान मोदींबाबत प्रचंड उत्साह आहे.
सिलिकॉन व्हॅली व भारताचे दृढ संबंध आहेत. तंत्रज्ञान कंपन्यांसाठी भारत कौशल्यपूर्ण मनुष्यबळ देणारा देश आहे. आयआयटी व इतर संस्थांच्या प्रतिभावंतांनी साकारलेली उत्पादने व तंत्रज्ञानाने जगभरात बदल घडवण्यात मदत केली. भारत आता परिवर्तनाच्या क्रांतिकारक बदलांतून जातोय. येथे खूप लोक ऑनलाइन होतील. खासकरून हिंदी व इतर भारतीय भाषा बोलणारे ग्रामीण भागांतील बांधव. यामुळे भारतीयांचा फायदा होईल. मुलींसाठी तर हा बदल खूपच फायद्याचा आहे. नवी कौशल्ये, अत्याधुनिक शिक्षण व यशस्वी करिअर घडवण्याची संधी
त्यांना लाभेल. मोदींचे डिजिटल इंडिया व्हिजन त्याच्या केंद्रस्थानी आहे. त्याकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. त्यात प्रत्येकाला भागीदारी हवी आहे. आम्हीही अनेक अभिनव उत्पादने व तंत्रज्ञान बनवून त्या दिशेने काम करत आहोत.

तर पीएम मोदी, सिलिकॉन व्हॅलीत तुमचे स्वागत आहे. आम्ही येथे सॅन जोसच्या सॅप सेंटरमध्ये तुमचे आगमन व तुम्हाला ऐकण्याची प्रतीक्षा करत आहोत. तुमच्या येण्याने सिलिकॉन व्हॅलीचे लोक भारावतील, देशभरातील भारतीय उत्साहित होतील आणि आपल्या भागीदारीला नवी ऊर्जा व बळ मिळेल.’