आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi’S Grand Reception At London\'s Wembley Stadium

संबंधांची जादू: लंडनचे घड्याळ उलट केले की भारताची वेळ सुरू होते- मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लंडन शो. ६० हजार लोकांसमोर ८० मिनिटांचे भाषण. अनेक जुन्या गोष्टी नव्या स्वरूपात सांगितल्या, तर काहींचा प्रथमच उल्लेख. गरिबीपासून सुरू झालेले भाषण भारताला जगाचा गुरू बनवण्याच्या स्वप्नावर संपले. भारत टीव्ही-वृत्तपत्रांत दिसतो तसा नाही, असे सांगून माध्यमांत व्यक्त झालेला असहिष्णुतेचा मुद्दा खोडून काढला.

उदाहरणादाखल त्यांनी अलवरच्या इम्रानचा उल्लेख केला. कबीर-रहीम हे प्रेरणास्थान असल्याचे सांगितले. सुफी परंपरेचाही दाखला दिला. भारत धर्मनिरपेक्ष होता आणि कायम राहील, हे सांगणे हा उद्देश होता. रंजक अंदाजात ब्रिटन आणि भारताची तुलनाही केली. हातातील घड्याळ दाखवून ते म्हणाले - इंग्लंडचे घड्याळ जी वेळ दाखवते, तेच घड्याळ उलट केले की भारतीय वेळ दिसते. ब्रिटिश संसदेबाहेरील गांधीजींचा पुतळा भारतीयांसाठी अभिमानाची बाब आहे. भारताला जगाची मेहरबानी नको, तर बरोबरी हवी. मोदी आता रविवारी तुर्कीला रवाना होतील.

800 हून अधिक कलाकारांचे सादरीकरण. 2000 स्वयंसेवक जुंपले होते. 112 दिवसांपासून याची तयारी सुरू होती. उद्योगपती नत पुरी यांची संस्था ‘युरोप-इंडिया फोरम’ने आयोजन केले होते. 300 पेक्षा जास्त संस्थांनी मदत केली.
>योग, भरतनाट्यम, ओडिशी, कथक, कुचीपुडी, गरबा, भांगडासह अनेक प्रकारची नृत्ये कार्यक्रमात सादर झाली. शामक दावर, अलिशा चिनॉयसह अनेक प्रसिद्ध कलावंतांनी सादरीकरण केले.
>लिसेस्टर, मँचेस्टर, बर्मिंगहॅमसारख्या दूरवरच्या शहरांतून लोकांना स्टेडियमपर्यंत आणण्यासाठी ‘मोदी एक्स्प्रेस’ बसेस चालवण्यात आल्या. ब्रिटनमधील सर्वात मोठी आतषबाजी करण्यात आली.
एक दिवस भारतवंशीय असेल ब्रिटनचा पीएम
भारतीयांनी इंग्लंडचा समाज, राजकारण व अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले आहे. यंदा सर्वाधिक जास्त १० भारतवंशीय इंग्लंडच्या संसदेत आले आहेत. एक दिवस असा येईल की तेव्हा भारतवंशीय ब्रिटनचा पंतप्रधान बनेल.
- डेव्हिड कॅमरून, ब्रिटिश पीएम.

Latest update
00.22AM: 15 डिसेंबरपासून लंडन -अहमदाबाद डायरेक्ट विमानसेवा सुरु होणार- मोदी
00.15AM: अलवर येथील एका युवकाने 50 अॅप्स बनवल्या- मोदी
00.11AM: भारतात पाहाण्यासाठी भरपूर काही - मोदी
00.10AM : टीव्हीत दिसतो फक्त तेवढाच भारत नाही- मोदी
00.05AM : आम्हाला आधुनिक भारताची निर्मिती करायची आहे. - मोदी
00.02AM : भारत सोलर एनर्जी राष्ट्र बनू शकतो. आमची त्या दिशेने वाटचाल सुरु आहे - मोदी

11.53PM : FDI अर्थ 'फास्ट फास्ट डेव्हलप इंडिया- मोदी
11.45PM : जन धन योजनेला देशात मोठे यश- मोदी
11.40PM :संपूर्ण जग दहशवाद अ ग्लोबल वार्मिंगच्या संमस्येला तोंड देत आहे.- मोदी
11.38PM : आम्हाला जगाकडून उपकार नकोत, बरोबरीचे स्थान हवे आहे- मोदी
11.36PM : भारताच्या भूमीला कबीर व रहीम यांची वचने आम्हाला प्रेरणा देतात. सूफी परंपरेंचा प्रभाव असता तर दहशतवाद इतका फोफावला नसता- मोदी
11.34PM : ब्रिटनने केलेला सन्मान एका व्यक्तीचा नव्हे संपूर्ण भारतीयांचा आहे.- मोदी
11.29PM : ब्रिटिश संसदेबाहेर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुतळा असणे भारतासाठी गौरवास्पद - मोदी
11.26PM : कॅमरन यांचे मोदींनी मानले आभार
11.25PM :भारत सर्वार्थाने सामर्थ्यवान देश आहे - मोदी
11.23PM :विविधता ही भारताची मोठी शक्ती- मोदी
11.21PM :आजचा दिवस दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक- मोदी
11.19PM :भारतीयांनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करणार- नरेंद्र मोदी
11.15PM :भारत तरुणांचा देश, प्रगतीची मोठी संधी- मोदी
11.10PM :भारताच्या विकासासाठी ब्रिटन सहकार्य करेल- कॅमरन
11.05PM : संयुक्त राष्‍ट्रात भारताला स्थायी सदस्यत्व मिळावे- कॅमरन
11.04Pm : आजचा दिवस दोन्ही देशांच्या कायम स्मरणात राहील- कॅमरन
10.56Pm : लंडनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरन यांनी 'नमस्ते वेम्ब्ली' ऑडियन्सला संबोधित केले.
10.52PM : ब्रिटन व भारताचे राष्ट्रगीत सादर करण्‍यात आले.
10.50PM : पंतप्रधान मोदी व लंडनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरन व्यासपीठावर पोहोचले
10.17PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी वेम्ब्ली स्टेडियमवर पोहोचले

90,000 लोक बसण्याची क्षमता
फुटबॉल सामन्यासाठी प्रसिद्ध असलेले वेम्ब्ली स्टेडियममध्ये 90,000 लोक बसण्याची क्षमता आहे. स्टेडियमच्या सीट्स भारतीय राष्ट्रध्वज तिरंग्याच्या रंगांनी सजवण्यात आले आहे.

2,000 व्हॉलिंटियर्स तैनात
या भव्य कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी 2,000 व्हॉलिंटियर्स मागील 112 दिवसांपासून परिश्रम घेत आहेत आहे. ब्रिटिश-इंडियन इंडस्ट्रियलिस्ट नाथू राम पुरी यांची नॉन प्रॉफिट ऑर्गनाइझेशन यूरोप इंडिया फोरम ऑर्गेनाइझने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहेत.
'टू ग्रेट नेशन्स, वन ग्लोरियस फ्यूचर'
रंगारंग कार्यक्रमाला स्थानिक वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता (भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता) सुरुवात झाली असून तो सायंकाळी 6.30 (भारतीय समयानुसार रात्री 12 वाजता) चालणार आहे. 'टू ग्रेट नेशन्स, वन ग्लोरियस फ्यूचर' अशी या कार्यक्रमाची आहे.

यापूर्वी मोदींनी या देशांचा केलाय दौरा...
> पंतप्रधान मोदी यांनी सप्टेंबर 2015 मध्ये सॅन होजेमध्ये सॅप सेंटरमध्ये संबोधित केले होते. या कार्यक्रमाला 18,000 भारतीय उपस्थित होते.
> दुबईमध्ये ऑगस्टमध्ये पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमाला 40 हजार लोक उपस्थित होते.

> न्यूयॉर्कमध्ये मेडिसन स्क्वेयर गार्डन
सप्टेंबर 2014 मध्ये अमेरिकेच्या दौर्‍यावर असताना पंतप्रधान मोदींनी न्यूयॉर्कमधील मेडिसन स्क्वेयर गार्डनवर भारतीय नागरिकांशी संवाद साधला होता.

> ऑस्ट्रेलिया का ऑलफोन्स एरीना
अमेरिकेनंतर मोदींनी नोव्हेंबर 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. सिडने येथील ऑलफोन्स एरीनामध्ये मोदींनी 16 हजार अनिवासी भारतीयांशी संवाद साधला होता.

> टोरंटो
एप्रिल 2015 मध्ये मोदींनी कॅनडाचा दौरा केला होता. तब्बल 42 वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांनी कॅनडाचा दौरा केला. या दौर्‍यात मोदींनी 10 हजार भारतीयांशी संवाद साधला होता.

> शांघाई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2015 मध्ये शांघाईचा दौरा केला होता. मोदींच्या स्वागतासाठी येथील भारतीय लोकांनी भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पाच हजार लोक उपस्थित होते.

पुढील स्लाइड्स पाहा, वेम्ब्ली स्टेडियमवर सुरु असलेल्या रंगारंग कार्यक्रमाचे फोटोज...