आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मोहम्मद व्यंगचित्र स्पर्धा: ISISच्या इशार्‍यानंतर शस्त्रास्त्र घेऊन पोहोचले स्पर्धक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो: अरिझोनामधील स्पर्धेत शस्त्रास्त्र घेऊन पोहोचलेले स्पर्धक)
न्यूयॉर्क- अमेरिकेतील अरिझोनामधील फीनिक्समध्ये आयोजित मोहम्मद व्यंगचित्र कॉन्टेस्टदरम्यान स्पर्धक आणि आंदोलकांमध्ये शुक्रवारी मोठा संघर्ष झाला. एका माजी लष्कर अधिकारी जॉन रिट्जहिमरने ही स्पर्धा आयोजित केली होती. दुसरीकडे, दहशतवादी संघटना आयएसआयएसने स्पर्धेत स्फोट घडवून आणण्‍याची धमकी दिली आहे. या पार्श्वभूमीवर स्पर्धेत सहभागी झाले बहुतेक स्पर्धकांनी शस्त्रास्त्र सोबत आणले होते.

आयएसआयएसच्या धमकीला घाबरण्याची काही आवश्यकता नाही. त्यांच्याशी दोन हात करण्यासाठी स्पर्धेला येताना आपल्या शस्त्रास्त्र आणावीत, असे आवाहन आयोजक जॉन रिट्जहिमर यांनी स्पर्धकांना केले होते. परंतु, आयोगकांच्या आवाहनामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. अरिझोनामध्ये सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगणे बेकायदा मानले जाते.

यामुळे भडकले आंदोलक...
स्पर्धेच्या ठिकाणी स्पर्धेकांना टी-शर्ट्स वाटप करण्यात आले. या सर्व टी-शर्ट्सवर इस्लाम धर्माविरुद्ध वादग्रस्त मजकूर लिहिला होता. त्यामुळे आंदोलक आणखी भडकले. दुसरीकडे, आयएसआयएसने सोशल मीडियावर माजी मरीन यांच्या घराचा पत्ता पोस्ट केला आहे.

अमेरिकन प्रशासनाने व्यक्त केली चिंता
फीनिक्स के कम्युनिटी सेंटरमध्ये शुक्रवारी सर्वात जास्त गर्दी होते. यामुळे जॉन रिट्जहिमरने या स्पर्धेचे आयोजन केले. स्पर्धा रात्र‍भर सुरु होती. अमेरिकन प्रशासनाने यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. सुरक्षा एजन्सी आणि स्थानिक अधिकारी स्पर्धेवर लक्ष ठेऊन होते.
पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधित फोटोज...