आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Monica Lynn Travels The World Without Spending Any Money

परपुरुषांबरोबर Dating करून जगभर फिरायची हौस भागवतेय ही तरुणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभ्रमंती करणारी मोनिका लिन. - Divya Marathi
जगभ्रमंती करणारी मोनिका लिन.
वॉशिंग्टन - अमेरिकेच्या अलबामा येथील एक 25 वर्षीय तरुणी सध्या इंटरनेटवर चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च न करताच तिने जगातील सुमारे 9 देशांत फिरण्याची हौस पूर्ण केली आहे. त्यासाठी मोनिका लिन नावाच्या या तरुणीने पुरुषांबरोबर डेटींग करत पैसे मिळवले.

अशी सुचली कल्पना...
इंटरनॅशनल मीडियावर मोनिकाची स्टोरी आल्यानंतर सोशल साईट्सवर ती चांगलीच प्रसिद्ध होत आहे. तिने सांगितले की, ती ऑनलाईन भेटणाऱ्या लोकांबरोबर डेट करायची. पण त्यापूर्वी ती पुरुषांचे बॅकग्राऊंडही चेक करायची. डेट करणाऱ्या पुरुषांनी कधीही सेक्सची मागणी केली नाही, असे ती सांगते. मोनिकाने जानेवारीपासून डिसेंबर दरम्यान दुबई, हाँगकाँग, इटली, इंडोनेशियासह इतर देशांमध्ये प्रवास केला आहे.

मोनिका आधी आर्थिक सल्लागार म्हणून काम पाहत होती. पण जगभ्रमंतीसाठी तिने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मोनिका सांगते की, जर तिने स्वतः एवढं फिरायचा प्लॅन केला असता तर तिला पैसे जमवण्यासाठी अनेक वर्षे लागली असती. मिस ट्रॅव्हल नावाच्या एक वेबसाईटद्वारे तिला ही कल्पना सुचली. या डेटींग साइटवर लोक संभाव्य पार्टनरसाठी पैसे खर्च करायला तयार होतात.

विशेष म्हणजे, जानेवारी 2015 पूर्वी मोनिका कधीही अमेरिकेबाहेर गेली नाही. पण एकदा प्रवास सुरू केल्यानंतर तिने सलग अनेक दिवस प्रवास केला. सुरुवातीला तिला ही कल्पना विचित्र वाटली होती. पण नंतर तिने याचा स्वीकार केला.

पुढील स्लाइड्सवर पाहा, मोनिकाचे आणखी काही PHOTOS...