आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: डोंगर पोखरणे या मशीनसाठी अवघ्या काही मिनिटांचा खेळ!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क - देशभरातून विरोध होत असतानाही जर्मनीची कोळसा खाण गार्जवेलर येथे बांधकाम सुरू झाले आहे. यासाठी जर्मनी सरकारने सर्वात मोठे एक्सकेव्हेटर मशीन उतरवले आहे. याचा विरोध करण्यासाठी हजारो लोक कंस्ट्रक्शन साइटवर गर्दी करत आहेत. कोळसा खाणींपासून अवघ्या काही अंतरावर लोकवस्ती असल्याने त्यांच्या जिवाला धोका आहे असे पर्यावरणवादी म्हणत आहेत. स्थानिकांनी देखील या कंस्ट्रक्शनला तीव्र विरोध केला. तरीही सरकारने सर्वांचा विरोध झुगारून येथे काम सुरू केले. जर्मनीच्या माध्यमांमध्ये हे विशालकाय एक्सकेव्हेटर चर्चेचा विषय ठरत आहे. 

काही मिनिटांतच डोंगर पोखरू शकते ही मशीन
> जर्मनीत या मशीनचा वापर प्रामुख्याने कोळसा खाणी खोदण्यासाठीच केल्या जातो. 
> ही मशीन इतकी शक्तीशाली आहे, की एखादे डोंगर पोखरणे या मशीनसाठी अवघ्या काही मिनिटांचा खेळ आहे. 2005 मध्ये या विशालकाय मशीनची निर्मिती झाली होती. 
> नैसर्गिक साधन संपदेने भरलेल्या जर्मनीसाठी मशीन मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. त्यामध्ये ही सर्वात शक्तीशाली मशीन बनली आहे.  
> जर्मनीच्या सीमावर्ती भागांमध्ये अतिशय थंड वातावरण आहे. शून्यापेक्षा कमी अंश सेल्सियसच्या तापमानात मनुष्यबळ मिळणे कठिण आहे. त्यामुळे देखील मशीनचा जास्तीत-जास्त वापर केला जातो. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या भीमकाय मशीनचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...