आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेपाळ भूकंप : ४ महिन्यांचे बाळ २२ तासांनी ढिगाऱ्यातून सुरक्षित काढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
का‌‌ठमांडू - भक्तपुरात शनिवारच्या भूकंपात एक घर पूर्णपणे कोसळले. त्यात चार महिन्यांचा सोनित हा मुलगा ढिगाऱ्यांखाली दबला. रात्री १२ वाजता नेपाळ लष्कराला ही माहिती दिली. शोधमोहिमेनंतरही तो न सापडल्याने जवान परतत असताना रडण्याचा आवाज आला. लष्कर पुन्हा शोधकामास लागले. अखेरीस रविवारी सकाळी दहा वाजता सोनितला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, बुधवारी हा फोटो जगासमोर आला.