आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जग एकवटले, CST सह जगभरातील वास्तु रंगल्या फ्रान्सच्या झेंड्याच्या रंगात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - फ्रान्ची राजधानी पॅरिसमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जग एकवटल्याचे चित्र आहे. मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी टर्मिनसची इमारत या रंगाच्या रोषणाईत रंगवण्यात आली. न्यूयॉर्कनेही या दुःखात फ्रान्सबरोबर असल्याचे दाखवत अमेरिकेची सर्वात उंच इमारत वर्ल्ड ट्रेड सेंटरला फ्रान्सच्या झेंड्याच्या रंगांची म्हणजे लाल, पांढऱ्या आणि निळ्या रंगाची रोषणाई करण्यात आली होती. तसेच न्यूयॉर्क आणि मॅनहटनमध्ये शहरातील एम्पायर स्टेट बिल्डिंगसारख्या अनेक इमारतींवर अशी रोषणाई करण्यात आली आहे.

त्याशिवाय जगभरातील अनेक देशांच्या प्रसिद्ध इमारतींवर फ्रान्सच्या रंगाची रोषणाई दिसून आली. लंडनच्या टॉवर ब्रिजपासून सिडनीच्या ओपेरा हाऊस, सॅन फ्रान्सिस्को सिटी हॉल, टोरंटोचा सीएन टॉवर, लास वेगासचे रोलर फेरिस व्हील आणि ब्राझीलच्या क्रिस द रिडीमर स्टॅच्यूलाही फ्रान्सच्या झेंड्याच्या रंगात रंगवण्यात आले.

पुढील स्लाइड्सवर पाहा. फ्रान्सच्या झेंड्याच्या रंगात रंगलेल्या जगभरातील काही इमारतींचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...