आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इर्मा- दुसऱ्या महायुद्धातील एकूण बॉम्बपेक्षा दुपटीने अधिक विध्वंसक वादळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोस-  कॅरेबियन बेटांवर इर्मा चक्रीवादळाने थैमान घातले आहे. अँटिगुवा, बारबुडा व सेंट मार्टिन बेटांवर अवशेषांचे ढिगारे दिसू लागले आहेत. बेटांवरील ९० टक्के इमारती कोसळल्या आहेत. त्यात सुमारे १५ जणांचा मृत्यू झाला. वादळामुळे वारे ताशी २७० किलोमीटर वेगाने वाहू लागले असून ते हैतीच्या दिशेने आगेकूच करू लागले आहे. आमचा देश जणू एक महाकाय ढिगारा बनला आहे. हे वादळ विध्वंसक आहे, असे बारबुडाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे.
 
७ लाख कोटी वॅट्सएवढी चक्रीवादळात शक्ती  
- मॅसाच्युसेट्स विद्यापीठातील तज्ज्ञ केरी इम्यनुएल यांच्या मते, दुसऱ्या महायुद्धात वापरण्यात आलेल्या एकूण बॉम्बच्या दुपटीने जास्त विध्वंसक हे वादळ आहे. वादळाची शक्ती सुमारे ७ लाख कोटी वॅट्स एवढी आहे. दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्बसह सर्व प्रकारच्या वापरण्यात आलेल्या बॉम्बची क्षमता ३ लाख कोटी वॅट्स होती.  
- श्रेणी-५  मधील इर्मा वादळ जोस व केटिया वादळांच्या मिश्रणातून तयार झाले आहे. त्यामुळे त्याची शक्ती वाढली आहे. ते जास्त विध्वंसक बनले आहे.  
- अमेरिकेत इर्माचे नामांतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची मुलगी इव्हांका यांच्यावरून ठेवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू, १० हजार लोकांची स्वाक्षरी.  
- शनिवारी फ्लोरिडाला धडकेल. आतापर्यंत किनारपट्टीवरील १ लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.  
वादळाचा आतापर्यंत लहान लोकसंख्येच्या प्रदेशाला तडाखा, फ्लोरिडात मोठ्या हानीची भीती  
बारबुडा व अँटिगुवा- इर्मा सर्वात अगोदर येथेच धडकले. ९५ टक्के इमारती उद्ध्वस्त. प्रदेशातील सुमारे ८० हजार लोकांपैकी ६० टक्के लोक बेघर झाले आहेत.  
सेंट मार्टिन- फ्रान्सचे शासन असलेल्या बेटाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेकडो घरांची छते उडून गेली आहेत. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला. 
प्युर्टोरिको- वीज व्यवस्था ठप्प. ९ लाख लोक अंधारात. रुग्णालयात जनरेटवर काम. ५० हजार लोकांना पिण्याच्या पाण्याचा अभाव.  
बातम्या आणखी आहेत...