आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • More Job Vacancy At America, Latest News In Marathi.

अमेरिकेत नोकऱ्यांचा पाऊस, 2 लाख 92 हजार रोजगार निर्मिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- आतापर्यंत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासल्याची चर्चा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत मात्र देशातील चित्र पालटले आहे. रोजगाराच्या सुमारे २ लाख ९२ हजार संधी उपलब्ध झाल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नोकऱ्यांचा जणू पाऊस पडला आहे.

देशाच्या कामगार विभागाकडून हा दावा करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीचे प्रमाण गेल्या दोन महिन्यांत वेगाने वाढले आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेलादेखील गती मिळेल, असा विश्वास जाणकारांना वाटतो. रोजगार निर्मिती वाढली असली तरी उत्पन्नाच्या प्रमाणात मात्र उत्साही वाढ दिसून आलेली नाही. परंतु एकूणच दोन महिन्यांतील रोजगार निर्मिती कामगार क्षेत्रासाठी अधिक सकारात्मक ठरली आहे. त्या अगोदर देशात रोजगारवाढीला काहीही संधी नसल्याने बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली होती. अर्थातच सरकारसाठी ही डोकेदुखी ठरली होती, तर विरोधकांसाठी टीकेची आयती संधी होती.

पूर्ण वेळचे प्रमाण अल्प
रोजगार निर्मिती आणि संधी वाढल्या असल्या तरी त्या विशिष्ट क्षेत्रापुरत्या मर्यादित आहेत. त्यात वाढ होणे गरजेचे आहे. अर्धवेळ नोकऱ्यांची संधी वाढली आहे; परंतु पूर्णवेळ नोकऱ्यांची वानवा आहे.

६ वर्षांनंतर उभारी
अमेरिकेला गेल्या सहा वर्षांपासून मंदीचा तडाखा सहन करावा लागत आहे; परंतु आता काही प्रमाणात देशाने उर्ध्व दिशेने वाटचालीला सुरुवात केली आहे.

अंदाज चुकला
अमेरिकेतील रोजगारवाढीचा अंदाज यापूर्वी चुकला आहे. अर्थशास्त्रज्ञांनी देशात किमान २ लाख रोजगार निर्माण होतील, असे म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात ही संख्या तीन लाखांच्या घरात पोहोचली आहे. त्यामुळे तरुणांमध्ये समाधान आहे.

आरोग्य क्षेत्रात संधी
आरोग्य, बांधकाम, व्यावसायिक, उद्योजकीय इत्यादी क्षेत्रांत अमेरिकेत गेल्या दोन महिन्यांत रोजगाराचे प्रमाण वाढले आहे. नवीन व्यावसायिकांना या क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे या क्षेत्राला पुन्हा गती मिळू शकेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.