आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणसमोर आव्हान,कट्टरवाद्यांचा विरोध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेहरान - आण्विक कार्यक्रमासंबंधीच्या आराखड्यावर इराणने सहमती दर्शवली असली तरी तेथील सरकारसमोर देशातील कट्टरवाद्यांचे आव्हान आहे. कट्टरवादी गटांकडून या सहमतीला विरोध होऊ शकतो.
स्वित्झर्लंडमध्ये शुक्रवारी सहा देशांच्या उपस्थितीत इराणकडून सहमती व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे आता इराणच्या आण्विक कार्यक्रमावर आंतरराष्ट्रीय अणु ऊर्जा संस्थेची कडक निगराणी राहील.
आराखड्यात इराणला युरेनियमन संवर्धनाची मर्यादा ३.६७ टक्क्यापर्यंत ठेवण्यात आली आहे. एवढ्या युरेनियममध्ये देशाची विजेची गरज पूर्ण होते, असे पश्चिमेकडील देशांचे म्हणणे आहे. दुसरीकडे इराणसोबतच्या प्राथमिक कराराचा मसुदा ३० जून २०१५ पर्यंत तयार करावा लागणार आहे. ही बाब इराणसाठी दिलासा देणारी आहे. परंतु इराणचा ही नरमाईची भूमिका देशातील कट्टरवाद्यांना आवडणारी नाही. त्यामुळे असे गट सरकारला विरोध करू शकतात.