आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज पडल्यास आणखी सर्जिकल स्ट्राइक्स; भारतीय अमेरिकींसमाेर पंतप्रधान मोदींचे भाषण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन- पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी काश्मीरच्या उरी येथील लष्करी तळावर केलेल्या हल्ल्यात १९ जवान शहीद झाले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकमधील अतिरेकी तळांवर सर्जिकल स्ट्राइक्सद्वारे हल्ला चढवला. तेव्हा जगाला आमच्या ताकदीची जाणीव झाली. गरज पडल्यास भारत आणखीही सर्जिकल स्ट्राइक करू शकेल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्जिनिया येथे भारतीय अमेरिकी नागरिकांसमोर बोलताना दिला.

मोदी म्हणाले, जगाला दहशतवादाचा चेहरा दाखवण्यात भारताला यश आले आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइकवर बड्या देशाकडून एकाही प्रश्नाची विचारणा झाली नाही. २० वर्षांपूर्वी आम्ही दहशतवादावर बोलत होतो तेव्हा अनेकांना आमच्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न वाटत असे. दहशतवाद्यांनीच आता दहशतवादाची ओळख करून दिली.त्यामुळे आम्हाला सांगायची गरज नाही.

सर्जिकल स्ट्राइकमुळे ज्यांचे कुणाचे नुकसान झाले असेल तो वेगळा मुद्दा आहे,असे पाकिस्तानचा संदर्भ देत त्यांनी सांगितले. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत जगाच्या मांडणीत फेरबदल करू इच्छित नाही. भारताची ही परंपरा आणि संस्कृती आहे . चीनच्या दक्षिण चीन सागरातील भूमिकेच्या संदर्भात मोदी यंानी हे वक्तव्य केले.
बातम्या आणखी आहेत...