आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिलिपाइन्समध्ये तुरुंगावर हल्ला; १५८ कैदी फरार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनिला- फिलिपाइन्समधील किडापवन तुरुंगावर आज बुधवारी पहाटे शेकडो सशस्त्र लोकांनी हल्ला केला. याचा फायदा उठवून जवळपास १५८ कैदी बंदिजन पळून गेले. एकूण १,५११ कैद्यांच्या या तुरुंगात साधारणत: दोन तास आग तोडफोड - गोळीबार सुरू होता. हल्ल्यात एका तुरुंगरक्षकाचाही मृत्यू झाला. किडापवनचे पोलिसप्रमुख लियो अजेरो यांनी सांगितले की, पळणाऱ्या कैद्यांमधून एक-दोघांना पकडता आले.  तुरुंग अधीक्षक पीटर बंगट यांनी हल्ल्यासाठी मोरो इस्लामिक लिबरेशन फ्रंट (एमआयएलएफ) पासून वेगळे झालेल्या मुस्लिम बंडखोर गटास जबाबदार ठरविले आहे. त्यानुसार हल्लेखोर गटाचा कमांडर एमआयएलएफशी संबंधित आहे. एमआयएलएफ फिलिपाइन्समधील सर्वात मोठे मुस्लिम संघटन आहे. या गटाची सरकारबरोबर शांततेची बोलणी सुरू आहे. बंगट यांच्या अनुसार हा एक सुनियोजित कट होता. आग लागल्यानंतर कैदी कंबळ (घोंगड्या)च्या मदतीने पळाले. एमआयएलएफने सांगितले की, त्यांना हल्ल्याची कुठलीही माहिती नव्हती. ते आपल्या सदस्यांशी विचारपूस करत आहेत, माहिती काढत आहेत.  
 
 
बातम्या आणखी आहेत...