आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तुर्कीत विवाह सोहळ्यामध्ये बाॅम्बहल्ला; 51 वऱ्हाडींचा मृत्यू, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या ब्लास्टमध्ये सुमारे 60 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. - Divya Marathi
या ब्लास्टमध्ये सुमारे 60 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
अंकारा- तुर्कीत एका विवाह सोहळ्यात करण्यात आलेल्या बाॅम्बहल्ल्यात किमान ५१ वऱ्हाडींचा मृत्यू, तर ६९ लोक जखमी झाले. सिरिया सीमेवरील गाझियानटेप शहरातील आनंद सोहळ्यावर त्यामुळे शोककळा पसरली होती. घटनेने संपूर्ण जग हादरले.
शनिवारी मध्यरात्रीनंतर हा सोहळा सुरू असताना हल्लेखोराने हल्ला केला. त्यात किमान ९४ जण जखमी झाल्याचा अंदाज गाझियानटेपचे गव्हर्नर अली येरलिकाया यांनी व्यक्त केला. विवाह सोहळ्यातील हा हल्ला निश्चितपणे दहशतवादी हल्ला असल्याचा दावा त्यांनी केला. हल्ल्यामागे नक्की कोणाचा हात आहे, याची निश्चित माहिती नसली तरी हा आत्मघाती हल्ला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे. दहशतवादी हल्ल्यातून लोकांना भीती घालण्याचा हेतू असू शकतो, परंतु अशा गोष्टींना थारा नाही, असे उपपंतप्रधान मेहमेट सिमसेक यांनी सांगितले.
हस्तकाच्या मदतीने इसिसचा हल्ला : एर्दोगन
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने हस्तकाच्या मदतीने विवाह सोहळ्याला लक्ष्य केले आहे, असा दावा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसिप तायप एर्दोगन यांनी केला आहे. तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकणार नाहीत, हाच आमच्या देशाचा व आमचा संदेश आहे. तोच मला पुन्हा द्यावासा वाटतो, असे एर्दोगन यांनी म्हटले आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, ब्लास्टचे PHOTOS
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...