आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या व्‍यक्‍तीमुळे 918 जणांनी केली होती आत्‍महत्‍या; वाचा, धक्‍कादायक कहाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आतापर्यंत तुम्‍ही अशा क्रुर शासकांबद्दल ऐकले असेल ज्‍यांनी लाखो निष्‍पापांचा जीव घेतला. मात्र आज आम्‍ही तुम्‍हाला अशी धक्‍कादायक कहाणी सांगणार आहोत ज्‍यामुळे संपूर्ण जग हादरले होते. हा किस्‍सा आहे आर्थिक महासत्‍ता अमेरीकेतील आणि ज्‍याच्‍यामुळे हा किस्‍सा घडला त्‍याचे नाव आहे जिम जॉस 


एकाच वेळी 918 जणांनी केली होती आत्‍महत्‍या 
कम्‍युनिस्‍ट विचारधारेचा जिम जॉस स्‍वत:ला मसिहा समजायचा. गरजू लोकांना मदत करण्‍यासाठी 1956मध्‍ये त्‍याने पिपल्‍स टेंपल नावाचे चर्च बनवले होते. त्‍याच्‍या भाषणने प्रभावित होऊन अनेक जण त्‍याचे फॉलोअर्स बनले होते. हे चर्च नंतर त्‍याने कॅलिफोनिर्यातील रेडवुड व्‍हॅली येथे शिफ्ट केले. अमेरीकी सरकारपेक्षा त्‍याचे विचार अगदी वेगळे होते. त्‍यामुळे या सर्वांपासून दूर जात आपल्‍या फॉलोअर्ससह दक्षिण अमेरीकेतील गुयाना येथे त्‍याने आपले ठाण मांडले. मात्र तेथे गेल्‍यावर भक्‍तांना त्‍याचे खरे रुप कळाले. तो भक्‍तांना 11-11 तास राबवून घ्‍यायचा. रात्रीही स्‍पीकरवर त्‍याचे भाषण ऐकवले जात असे. त्‍यामुळे या भक्‍तांची नीट झोपही होत नसे. असे असले तरी त्‍याच्‍यावरील त्‍यांची श्रद्धा काही कमी झाली नव्‍हती. त्‍यामुळे अमेरीकी सरकारने जेव्‍हा त्‍या जागेवरुन निघून जाण्‍याचे त्‍यांना सांगितले तेव्‍हा याला शासनाची क्रुरता म्‍हणत जिमने त्‍याच्‍या भक्‍तांना आत्‍महत्‍या करण्‍यास सांगितले. नवल म्‍हणजे भक्‍तांनीही या आदेशाचे पालन करत विष पिऊन आत्‍महत्‍या केली. काही जण मात्र विष पिण्‍यास तयार नव्‍हते. तेव्‍हा त्‍यांना जबरदस्‍तीने विष पाजण्‍यात आले. तब्‍ब्‍ल 918 जणांनी एकाच दिवशी आत्‍महत्‍या केल्‍याने जगात खळबळ उडाली होती. या भयंकर घटनेचे फोटो पाहून असेही काही होऊ शकते यावर आजही लोकांचा बसत नाही. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या भयानक घटनेचे फोटोज.... 


 

बातम्या आणखी आहेत...