आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनची संरक्षण गुंतवणुकीत 152 दशलक्ष डॉलरची वाढ, भारतापेक्षा तिप्पट मोठे बजेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - लष्करी खर्चात प्रचंड वाढ करीत चीनने आपल्या संरक्षण खात्याच्या अर्थसंकल्पात १५२ दशलक्ष अमेरिकी डॉलरची वाढ केली असून ही रक्कम भारताच्या संरक्षण बजेटपेक्षा तीनपट मोठी आहे. पहिल्यांदाच चीनच्या संरक्षण खात्याच्या बजेटने ट्रिलियन येनचा आकडा गाठला आहे.  
 
दुसऱ्या विमानवाहू नौकेची बांधणी व तिसरी नियोजनाच्या टप्प्यात  : बीजिंगने आपल्या दक्षिण चीन समुद्रातील वाद पाहता ही भरभक्कम वाढ केली असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. हे बजेट १.०४ ट्रिलियन येन म्हणजेच १५२ यूएसडी (अमेरिकन डॉलर) चीनचे हे २०१७ चे संरक्षण बजेट ७ टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती चीनची प्रसिद्ध वृत्तसंस्था शिन्हुआने अर्थ मंत्रालयाच्या हवाल्याने दिली आहे. या बजेटमध्ये चीन प्रामुख्याने नौदलाचा मोठा विकास करणार आहे. चीनकडे सध्या एकच विमानवाहू नौका आहे आणि एकीचे बांधकाम सुरू असून चीन तिसऱ्या विमानवाहू नौकेचेही नियोजन करत आहे.  
 
चीनचा साळसूदपणाने स्वसंरक्षणाचा दावा  
व्हिएतनाम, फिलिपाइन्स, मलेशिया, ब्रुनेई आणि तैवान यांनीही दक्षिण चीन सागरी क्षेत्रावर दावा सांगितलेला आहे. चिनी लष्करी तज्ज्ञ म्हणतात, प्रामुख्याने बहुतांश वाढीव संरक्षण विभागाचे बजेट हे नौदलाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी खर्च केले जाईल; जेणेकरून ते आशिया पॅसिफिक विभागातील सध्याच्या तणाव व अस्थिर परिस्थितीत समर्थपणे संरक्षण करू शकेल आणि चीनचे परदेशी सागरी हितसंबंध जोपासू शकेल.   
 
 दक्षिण चीन समुद्र वाद, अमेरिकेला शह देण्याची रणनीती  
दक्षिण चीन समुद्राचा वाद हा एक वादाचा हॉटस्पॉट झालेला असून या पार्श्वभूमीवर चीन-यूएस लष्करी तणाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा यांनी आशियात अमेरिकी लष्कर पाठवले होते. त्याचा मुक्काम वाढवला होता. काही आशियाई देशांबरोबर संयुक्त नौदल सरावही केलेला आहे. यातून लष्करी ताकदीचे प्रदर्शन करून चीनला शह देण्याची व्यूहात्मक कूटनीती केली आहे. यासहच निवडणुकीनंतर ट्रम्प यांनीही दक्षिण चीन समुद्रात एक मालवाहू विमान पाठवले होते; जेणेकरून या वादग्रस्त चीनने हक्क सांगितलेल्या क्षेत्रात नेव्हिगेशन उड्डाण व नौदलविहाराचे स्वातंत्र्य अबाधित राहावे.     
 
लष्करी ताकद ही वाढत्या आर्थिक शक्तीचेच निदर्शक : प्रा. चू यिन
चीनची वेगाने वाढत असलेली लष्करी ताकद ही चीनच्या वाढत्या आर्थिक शक्तीचेच निदर्शक आहे. आर्थिक विभागीय हितसंबंधांच्या आड येणाऱ्यांना म्हणजेच चीन ट्रम्प यांना क्षमा करू शकणार नाही.लष्करी ताकद वेगाने वाढवल्याशिवाय सागरावरील गुंतवणूक व इतर आंतरराष्ट्रीय हितसंबंध कसे जोपासू शकेल, अशी टिप्पणी आंतरराष्ट्रीय संबंधांवरील विद्यापीठातील तज्ज्ञ प्रा. चू यिन यांनी सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सशी बोलताना केली.
बातम्या आणखी आहेत...