आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इजिप्तच्या मशिदीत स्फोट; 235 जणांचा मृत्यू, 110 जखमी; स्फोटानंतर लोकांवर गोळीबार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कैरो- इजिप्तच्या उत्तरी सिनाई येथील एका मशिदीत शुक्रवारी नमाजाच्या वेळी झालेल्या स्फोटात आणि गोळीबारात २३५ लोक ठार झाले, तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. इजिप्तची सरकारी एजन्सी “मीना’ने दिलेल्या वृत्तानुसार, अल-एरिशच्या अल रवादा मशिदीत शुक्रवारची नमाज होती. 


या वेळी अनेक स्फोट झाले. हल्लेखोरांनी मशिदीत आधीच स्फोटके दडवून ठेवली होती. स्फोटानंतर इकडे-तिकडे पळापळ करणाऱ्या लोकांवर चार वाहनांतून आलेल्या बंदूकधाऱ्यांनी गोळीबार सुरू केला. घटनास्थळी चोहोबाजूंनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसत होते. ५० रुग्णवाहिकांतून जखमींना नेण्याची व्यवस्था करण्यात आली. या वेळी झालेल्या बाॅम्बस्फोटामुळे मशिदीचे खूप नुकसान झाले.    


इजिप्तमध्ये आजवर झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी हा माेठा हल्ला आहे. सरकारी दूरचित्रवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, हल्ल्यानंतर राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी आपत्कालीन बैठक घेतली. इजिप्त सरकारने हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. या बैठकीत तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 
हा हल्ला इसिसने घडवून आणल्याचा संशय आहे.  

 

मुर्सींना हटवल्यानंतर हल्ले वाढले 
इजिप्तमध्ये २०१३ मध्ये लष्कराने लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या राष्ट्रपती महंमद मुर्सी यांना हटवल्यानंतर सिनाईमध्ये हल्ल्यांत वाढ झाली. या भागात दहशतवाद्यांनी शेकडो पोलिस व लष्करी जवानांची हत्या केली आहे. या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावरच हल्ले करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. याशिवाय चर्च व भाविकांवर हल्ले केले होते.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...