आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NEW YEAR EXCLUSIVE : जगातील सर्वात आनंदी व्यक्ती, 1991 नंतर झालेले नाहीत दुःखी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेपाळ /फ्रान्स - 2017 मध्ये तुम्ही आनंद ही सवय बनवू शकता. त्याच उद्देशाने आम्ही तुम्हाला नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका व्यक्तीची भेट घालून देणार आहोत. ते 1991 मध्ये अखेरच्या वेळी दुःखी झाले होते. त्यानंतर आजपर्यंत ते आनंदीच आहेत. यामागचे कारण जाणून घेण्यासाठी अमेरिकेच्या विद्यापीठाने 12 वर्षे रिसर्च केला. त्यासाठी मेंदूला 256 सेंसर लावण्यात आले. त्या सर्वानंतर स्वतः युनायटेड नेशन (UN) ने त्याला पृथ्वीवरील सर्वात आनंदी व्यक्ती म्हणून स्वीकारले. त्यांनी 45 वर्षात आनंदी राहणे किंवा आनंदी ही सवयच बनवून घेतली आहे. 
 
आमच्या वाचकांमध्येही अशीच आनंदी राहण्याची सवय विकसित व्हावी यासाठी आम्ही जगातील सर्वात आनंदी अशा मॅथ्यू रिकार्ड यांच्याशी खास बातचित केली आहे. यावेळी बोलताना मॅथ्यू म्हणाले की, मी फ्रान्समध्ये जन्मलो. 1971-72 पासून मी कायम आनंदी राहण्याचा प्रयत्न करू लागलो. तशी सवय लावून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. या 45 वर्षांत मी स्वतःवरच अनेक प्रकारचे रिसर्च केले. त्यातून आनंदी राहण्याचे विविध वैज्ञानिक मार्ग मी शोधलो. हीच माझ्या जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे. 
 
नव्या वर्षात अगदी विद्यार्थी, गृहिणी आणि ऑफिसमध्ये काम करणारे कर्मचारीही स्वतःला अशाप्रकारे आनंदी राहण्याची सवय लावून घेत असतात. अगदी मॅथ्यू यांच्या प्रमाणेच. मॅथ्यू यांनी आनंदी राहण्यासाठी अगदी सोपे असे पाच फॉर्म्युले सांगितले आहेत. किमान तीन महिने या पद्धती फॉलो केल्या तर तुम्हीही स्वतःला आनंदी राहण्याची ही सवय लावून घेऊ शकता. तसे तर मॅथ्यू आनंदी राहण्यासाठी मेडिटेशनसह इतर अनेक पद्धतींचा अवलंब करतात. पण आम्ही तुम्हाला याठिकाणी अशा काही पद्धती सांगणार आहोत, ज्या तुम्ही अगदी सहज रोजच्या जीवनात अवलंबू शकता. रोजच्या जीवनात आपल्याला करण्यास या पद्धती सोप्या जातील. 
 
भारतातील शिक्षकामुळे लागली आनंदी राहण्याची सवय 
- 70 वर्षीय मॅथ्यू म्हणाले की, आधी त्यांनाही इतरांप्रमाणे छोट्या छोट्या बाबींचे टेन्शन यायचे. 1972 च्या सुमारास जेव्हा ते दार्जिलिंगमध्ये आले त्यावेळी त्यांना त्यांचे शिक्षक कांगयूर यांनी डे टू डे लाइफमध्ये आनंदी राहण्याचा मंत्र दिला. हळू हळू ती त्यांची सवय बनली. 
- हाच माझ्या जीवनातील यू टर्न ठरला असे मॅथ्यू सांगतात. त्यानंतर मी फ्रान्स सोडीन दार्जिलिंग-नेपाळमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. 
 
1991 मध्ये टिचरचे निधन तेव्हा झाले होते अखेरचे दुःख 
- व्यवसायाने शास्त्रज्ञ आणि पीएचडी प्राप्त मॅथअयू यांनी सांगितले की, मला सर्वाधिक दुःख 1991 मध्ये माझे सर्वात प्रिय शिक्षक आणि मला जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनवणारे Dilgo Khyentse Rinpoche यांच्या निधनाने झाले होते. त्यानंतर मी परत कधीही दुःखी झालो नाही. 
- हसत गमतीत ते म्हणाले की, मी जगातील सर्वात आनंदी व्यक्ती बनलो, तेच माझ्यासाठी दुःखाचे कारण बनले आहे. मी जेथेही जातो तेव्हा लोक मला आनंदाचा फॉर्म्युला विचारू लागतात. 
 
अमेरिकेच्या विद्यापीठाने 12 वर्षे केला रिसर्च 
- मॅथ्यू यांनी सांगितले की, आनंदी राहण्याचे कारण जाण्यासाठी अमेरिकेच्या विस्कॉन्सिन साइंटिफिक युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या मेंदूवर 12 वर्षे संशोधन केले. 
- यादरम्यान त्यांच्या डोक्यावर 256 सेंसर लावून अगदी वाईट स्थितीतही माझ्या मेंदूत काय सुरू आहे, त्याचे काम कसे सुरू आहे याचा अहवाल तयार केला. 
- या रिसर्चनुसार माझ्यात एक गॅमा वेव्ह आढळली. ती जगातील पार कमी लोकांमध्ये डेव्हलप होत असते. त्यात कोणत्याही स्थितीत व्यक्ती आनंदी राहण्याचे प्रमाण वाढते. 
 
मेंदूतील चार केमिकल्सची कमाल 
- व्यक्तीच्या मेंदूमध्ये आनंद, दुःख, राग, प्रेम आणि इतर भावनांशी संबंधित वेगवेगळे केमिकल्स असतात. त्यांच्या अॅक्टीव्ह आणि डिअॅक्टीव्ह होण्याने वेगवेगळ्या भावना निर्माण होत असतात. 
- आनंदाबाबतही अशीच सिस्टीम असते. आपल्या मेंदूत कपाळाला लागून असलेला समोरील भाग आणि कानाच्यावर उजव्या बाजुला आनंदाशी संबंधित 2 भाग असतात. 
- हॅप्पिनेस केमिकल्सचा विचार करता मेंदूत याची संख्या 4 असते. त्यांची नावे Dopamine, Oxytocin, Serotonin, Endorphins अशी आहेत. 
- हे चारही केमिकल्स वेग वेगळ्या परिस्थितीत मेंदूत तयार होणाऱ्या आनंदाच्या भागात कमी जास्त प्रमाण झाल्याने आनंद कमी करतात किंवा वाढवतात.
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, 24 तास आनंदी राहण्याचे 5 सोपे मंत्र...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...