आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही कधीही पाहिली नसतील अशी जगभरातील झाडे, पाहून व्हाल थक्क

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगातील विविध भागांमध्ये पर्यटन करत असताना त्याठिकाणचे वैशिष्ट असलेल्या स्थळांना दिलेल्या भेटी कायम आपल्या स्मरणात राहत असतात. जगभरात भ्रमंती करण्याची छंद असलेल्यांची तर हे क्षण कॅमेऱ्यात टिपण्याची घाई असते. निळे आकाश, नितळ पाणी, डोंगर, दऱ्या अशा निसर्गसौंदर्याने पर्यटकांना भुरळ घातलेली असते. पण या सर्वाबरोबरच जगभरात विविध ठिकाणी आढळणाऱ्या झाडांमध्येही त्याठिकाणाप्रमाणे काही वैशिष्ट्ये असतात. घरासमोर लावलेली शोभेची अथवा मोठी झाडे, बागेतील झाडे यांचेही वेगळे रुप आपल्याला जगभ्रमंतीदरम्याम पाहायला मिळू शकते. विशेष म्हणजे जगात काही अशी झाडे आढळतात जी पर्यटकांना अाश्चर्यचकित करून सोडतील. अगदी स्वप्नवत अशी रंगसंगती असलेली ही झाडे, मनमोहून टाकणारी असतात. काही झाडे तर अगदी दीडशे वर्षे जुनही आहेत. पण प्रत्येकाला जगभ्रमंतीला जाऊन याचा आनंद घेता येईलच असे नाही. त्यामुळे जगातील अशा 20 अवर्णनीय झाडांच्या सौंदर्याचा आनंद लुटायची संधी आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, जगभरातील अशीच सुंदर सुंदर झाडे...