आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ISISचा मुख्‍य सूत्रधार हल्ल्यात मारला गेला, अमेरिकेने ठेवले होते 19 कोटींचे बक्षीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेरुत - सीरियात अमेरिकेच्या नेतृत्वा खालील लष्‍कराच्या हवाई हल्ल्यात दहशतवादी संघटना आयएसआयएसचा एक मोठा नेता तारिक बिन तहर अल-अवनी अल-हर्जीला मारला गेला आहे. अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटागॉनने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अल-हर्जी ट्युनिशियचा नागरिक होता आणि सीरिया-इराकमध्‍ये दहशतवादी आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा करत होता. अमेरिकेच्या सरकारने त्यावर 19 कोटी रुपयांचे बक्षीस ठेवले होते. दहशतवादी संघटनेत त्याची ओळख 'आत्मघातकी हल्ल्यांचा राजा' अशी होती. तो आयएसआयएस दहशतवाद्यांनी जगभरात केलेल्या शेकडो आत्मघातकी हल्ल्यांचा मुख्‍य सूत्रधार होता.

आयएसआयएसला मोठा हादरा
तारिक आखाती देशांमध्‍ये संघटनेसाठी निधी जमा करण्‍याचाही काम करत होता. तो इराकमधील अनेक आत्मघातकी हल्ले घडवण्‍यात आणि परदेशी बंडखोरांना सीरिया-इराक सीमेवर पोहोचवत असे. त्याच्या मृत्यूने आयएसआयएसमध्‍ये दुस-या देशातील बंडखोरांच्या प्रवेशावर परिणाम होणार आहे.
फाइल फोटो: तारिक बिन तहर अल-अवनी अल-हर्जी