आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मगरीच्या जबड्यातून आईने पोटच्या मुलास वाचवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॅन जोन्स - कोस्टारिकालगत किनारपट्टीवर राष्ट्रीय उद्यानात एका मगरीने केन्नर गुटियारेंजनामक बालकावर शुक्रवारी दुपारी हल्ला अचानक हल्ला केला. त्याला जबड्यात पक्के धरून ठेवले आणि खेचत मगर नदीच्या दिशेने निघाली. बालकाच्या आईने हे पाहिले आणि तिने जिवाची पर्वा न करता मगरीशी झुंज देत पोटच्या मुलाची सुटका केली.
‘ला नेसियों’ने दिलेल्या वृत्तानुसार, मुलाच्या ओरडण्याचा आवाज कानी पडताच टेरेसा नेवारोला आपले पोटचे मूल अडचणीत असल्याचे लक्षात आले. तिने पाहिले तर एक मगर मुलाला जबड्यात पकडून नदीच्या दिशेने ओढत नेण्याचा प्रयत्न करत होती. टेरेसाने मागचा-पुढचा विचार न करता थेट या मगरीवर तुटून पडली. सर्व शक्ती पणाला लावून तिने अखेर मुलाची सुटका करण्यात यश मिळवले. कितीतरी वेळ ही झुंज सुरू होती. मगर जबड्यातील शिकार सोडायलाच तयार नव्हती. या परिस्थितीत टेरेसाने मगरीवर जोरदार वार केले. अखेर मगरीलाच हार मानावी लागली.

मगरीच्या हल्ल्यात केन्नरचे हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली असली तरी त्याच्या जिवाला मात्र काहीही धोका नाही. टेरेसाने मुलावर प्राथमिक उपचार करून रुग्णालयात हलवले आणि त्याचे प्राण वाचले.

कोस्टारिकातील संशोधकांनुसार, देशात मगरींची संख्या गेल्या १५ वर्षांत तिपटीने वाढली असून आतापर्यंत विविध भागांत मगरींच्या हल्ल्यात १३ लोकांना प्राण गमावावे लागले आहेत. प्रामुख्याने नदीकिनारी या मगरी अधिक अाक्रमक होत आहेत.