आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एस्कॉर्ट सर्व्हिसच्या वेबसाईटवर आईला दिसली बेपत्ता मुलगी, या स्थितीत परतली घरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ह्यूमन ट्रॅफिकिंग आणि सेक्शुअल अब्यूजची शिकार ठरलेली एमए ऊर्फ जेन डो... - Divya Marathi
ह्यूमन ट्रॅफिकिंग आणि सेक्शुअल अब्यूजची शिकार ठरलेली एमए ऊर्फ जेन डो...
अटलांटा- अमेरिकेतील जॉर्जिया प्रांतात राहणा-या एका महिलेला आपल्या बेपत्ता मुलीचा शोध लागला आहे. महिलेच्या 13 वर्षाची मुलगी ह्यूमन ट्रॅफिकिंगची शिकार ठरली होती. ज्यानंतर तिला एस्कॉर्ट सर्व्हिसच्या व्यवसायात ढकलले. महिलेला आपल्या मुलीची तेव्हा माहिती मिळाली जेव्हा तिने सेक्स सर्व्हिससाठी मुलीची ऑनलाईन अॅड पाहिली. या तरूणीवर आय एम जेन डो नावाची डॉक्युमेंट्री बनवली गेली आहे जी यावर्षी रिलीज झाली आहे. ऑनलाईन अॅडवर पोहचली प्राईड...
 
- ही कहाणी अटलांटात राहणा-या कुबिकी प्राईड आणि तिची मुलगी जेन डोची आहे. जेन ह्यूमन ट्रॅफिकरमध्ये जाळ्यात अडकली आणि फसून एस्कॉर्ट सर्व्हिस धंद्यात अडकली. 
- 13 वर्षाची जेन आपल्या स्कूल पार्टीत गेली होती आणि ती महिला ट्रॅफिकरच्या गटात फसली. तिला वाटले की, ती महिला तिला तिच्या घरी ड्रॉप करेल, असे वाटले. मात्र, तिने जेनला सेक्स सर्विसमध्ये व्यवसायात ढकलले.
- मुलगी बेपत्ता झाल्यानंतर सुमारे 270 दिवसानंतर प्राईडने तिचा ऑनलाईन शोध सुरु केला. ती बॅकपेज डॉटकॉम वेबसाईट स्क्रॉल करत होती, तेव्हा एस्कॉर्ट सेक्शनमध्ये तिला तिच्या मुलीची जाहिरात दिसली.
- प्राईडने सांगितले की, वेबसाईटवर वरून तिसरी एक लिंक होती. त्यावर खूप सारे स्टार्स आणि हार्ट शेपचे स्टीकर्स होते आणि त्यावर लिहले होते की, यंग अॅंड न्यू. 
- या जाहिरातीवर असलेल्या स्टार्स आणि हार्टने तिचे लक्ष वेधले. तिने जेव्हा या जाहिरातीवर क्लिक केले तेव्हा तिला आपल्या मुलीचा आपत्तीजनक फोटोज पाहून धक्का बसला. 
- प्राईडने सांगितले की, तिची मुलगी जेनने फक्त अंडरवियर घातलेली होती आणि पोज देत होती. यानंतर तिने जाहिरातीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला व सर्व्हिस खरेदी केली.
 
ड्रग्स अॅडिक्ट झाली मुलगी, केले शोषण- 
 
- प्राईड सर्व्हिस घेण्याच्या बहाण्याने मुलगी जेनला घरी घेऊन आली. तेव्हा तिला कळले की, जेन ड्रग्स अॅडिक्ट झाली आहे. तिचे मोठ्या प्रमाणात लैंगिक शोषण केले होते.
- तिने सांगितले की, तिच्या मुलीला मारले गेले, चाकू मारला गेला आणि जाळण्याचा प्रयत्नही केला गेला. एवढेच नाही तर तिच्या डोक्यावरचे केस सुद्धा कापले गेले. 
- यानंतर ड्रग्सच्या सवयीमुळे तिने घरातून दोनदा पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही वेळेस आईने तिला परत घरी आणले.
 
वेबसाईटवर कोणतीच कारवाई नाही-
 
- जेनचे ट्रॅफिकिंग करणा-या आरोपी महिलेला अटक केली गेली आणि 2010 मध्ये पाच वर्षाची जेल झाली. मात्र, मुलीचे फोटोज आणि ऑनलाईन अॅड हटविली गेले नाहीत.
- 2011 मध्ये प्राईडने बॅकपेज डॉटकॉमवर केस दाखल केली. तसेच ही वेबसाईट चाईल्ड सेक्स ट्रॅफिकिंगला बळ देते. मात्र, तिची केस 230 कम्युनिकेशन्स डिसेन्सी अॅक्टनुसार खारिज करण्यात आली.  
- बॅकपेज अमेरिकेतील सर्वात मोठी ऑनलाईन क्लासीफाईड साईट आहे. या देशातील 80 टक्केहून अधिक ह्यूमन ट्रॅफिंकिंगच्याच जाहिराती असतात.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, जेनचे काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...