आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब आईची अशीही \'दानत\', मातेच्या दातृत्वाला शिक्षक, विद्यार्थ्यांचा सलाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: गरीब मुलासाठी पुस्तके, गणवेश भेट देताना सुरेखा गवळे.
औरंगाबाद - मोठा होऊन आईला दारिद्र्याच्या गर्तेतून बाहेर काढायचेच असे स्वप्न उराशी बाळगणारा, घर खर्चाला हातभार लागावा म्हणून आईला सांगता कष्ट करणारा पोटचा गोळा गमावलेल्या आईचे दु:ख वेदना किती अथांग असतील, याची कल्पनाही करवत नाही. मात्र, दु:खाचा डोंगर कोसळूनही डगमगता गरीब मुलांत आपले मूल बघून त्यांना मदत करण्याचा ध्यास या आईने घेतला. गरीब परिस्थिती आणि पतीपासून विभक्त राहत असतानाही काबाडकष्ट करीत पैसे जमवून ते गरिबांना देण्याची "दानत' या आईने दाखवून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

शहरातील बापूनगर परिसरात राहणाऱ्या सुरेखा गवळे यांना दोन मुले आणि एक मुलगी. त्यातला ऋत्विक हा थोरला मुलगा. त्याला शिक्षणाची मोठीच आवड. मोठेपणी पोलिस व्हायची मनीषा बाळगणारा ऋत्विक आईची परिस्थिती जाणून होता. दुसऱ्यांच्या घरातील कामे करून आई आपल्याला शाळेत पाठवत असल्याने त्याने तिच्या नकळत छोट्यामोठ्या कामांना सुरुवात केली. दहावीची परीक्षा दिल्यानंतर तो खट्याळ चिमुरड्यांच्या हास्यात दिसतोस तू..

उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहत होता. पोलिस होण्याची त्याची महत्त्वाकांक्षा. दहावीचा निकाल लागल्यावर नवीन कपडे घेऊन दे आणि माझा वाढदिवस चांगला साजरा कर, असा तो आईला म्हणाला होता, अशी त्याची मावशी रेखाताई यांनी सांगितले. पण नियतीला काही औरच मंजूर होते.
२४मे रोजी काळाचा घाला : उन्हाळीसुटीत ऋत्विकने मंडप डेकोरेटर्सकडे कामाला सुरुवात केली होती. २४ मे रोजी घरातून बाहेर पडलेला ऋत्विक परत आलाच नाही. मंडपाचे साहित्य नेताना टेम्पो उलटला. त्याखाली दबून ऋत्विक गंभीर जखमी झाला. रुग्णालयात जाईपर्यंत त्याच्या जीवनाचा दोर तुटला होता. सर्वांना दु:खाचा चटका देऊन तो कायमचा निघून गेला. नुकत्याच लागलेल्या दहावीच्या निकालात त्याने ५८ टक्के गुणही मिळवले.

स्मरण म्हणून मदत
सुरेखाताईंनी२७ जून रोजी ऋत्विकचा वाढदिवस त्याची शाळा शिवाजी हायस्कूलमध्ये साजरा करण्याचे ठरवले. त्यानुसार शनिवारी गरीब विद्यार्थ्याला पुस्तके आणि गणवेश देऊन वाढदिवस साजरा केला. यापुढे त्याच्या स्मरणार्थ एका होतकरू मुलाला शिक्षण देण्याचा ध्यास सुरेखाताई आणि आजी सुमन बनसोडे यांनी घेतला आहे. हातावर पोट असले तरी हा ध्यास कायम राहील, असे सुरेखाताई सांगतात. या मातेेच्या कर्तृत्वाला शाळेतील मुख्याध्यापक ए. जी. सुरेकर, शिक्षक संदीप तुपे पाटील यांच्यासह विद्यार्थ्यांनी सलाम केला.
बातम्या आणखी आहेत...