आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जेंटिनामध्ये अपघातानंतर कोमात गेलेली आई 4 महिन्यांच्या मुलाच्या स्पर्शाने आली शुद्धीवर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅलिफॅक्स (अर्जेंटिना) -  गेल्या वर्षीच्या एक नोव्हेंबरची ही गोष्ट. बेनन ही अर्जेंटिनाची महिला अधिकारी आपल्या सहकाऱ्यांसह गस्त घालत होती. त्या वेळी वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा अपघात झाला. पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या बेननच्या डोक्याला जखम झाली. डोक्यात रक्त साकळल्याने ती कोमात गेली. तिला जीवनरक्षक प्रणालीवर ठेवले.
 
अपघातानंतर ५४ दिवसांनी ख्रिसमसच्या दिवशी बेननने सँटिनोला जन्म दिला. सँटिनोची देखभाल करत असलेली तिची मावशी नियमितपणे तिला आईला भेटवण्यासाठी रुग्णालयात येत होती. सँटिनो आईसोबत खेळत होता. त्याच्या स्पर्शाने आईची स्थिती सुधारू लागली. बेनन ‘हो’ आणि ‘नाही’त प्रतिसाद देत होती. आता ती कोमातून बाहेर आली आहे. कुटुंबाने बेनन आणि सँटिनोचा व्हिडिओ शेअर केला आहे.

अर्जेंटिनाचे डॉक्टर याला चमत्कार म्हणत आहेत. मुलाच्या स्पर्शाने आई सहा महिन्यांनंतर कोमातून बाहेर आली हे अाश्चर्यजनक आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...