आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

16 वर्षांचा पोरगा बनला बाप, FB वरून जडले दोन मुलांच्या आईवर प्रेम...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जॅकपासून झालेल्या 9 महिन्यांच्या मुलासह कॅथलिन. - Divya Marathi
जॅकपासून झालेल्या 9 महिन्यांच्या मुलासह कॅथलिन.
आंतरराष्ट्रीय डेस्क - ब्रिटनच्या डरहॅम शहरात राहणारी 31 वर्षीय कॅथलिन मार्टिनची लव्ह स्टोरी सध्या खूप चर्चेत आहे. एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या रंजक प्रेमप्रकरणाचा खुलासा केला. कॅथरिन म्हणाली, 2015 मध्ये तिचा घटस्फोट झाला होता. तेव्हा ती दोन मुलांची आई होती. त्यात एक मुलगा 11, तर दुसरा 3 वर्षांचा होता. यादरम्यान फेसबुकवर 16 वर्षीय जॅक कुसाइल नावाच्या मुलाशी तिची मैत्री झाली. आणि दोघांत प्रेम झाले. कॅथलिन आता जॅकच्या 9 महिन्यांच्या मुलाची आई बनलेली आहे. 
 
अशी झाली पहिली भेट...
- फेसबुकवर कॅथलिन आणि जॅकच्या दररोज गप्पा होऊ लागल्या.
- एक दिवस बोलण्या-बोलण्यातच कॅथलिनने जॅकला बागकाम करण्यासाठी मदत मागितली.
- दुसऱ्याच दिवशी जॅक कॅथलिनच्या घरी पोहोचला. आणि अशा रीतीने त्यांची पहिली भेट झाली. यानंतर दोघे नेहमी भेटत राहिले.
- जॅकला प्रपोज करण्याआधी कॅथलिन खूप विचारात पडली होती. कारण तो तिच्या निम्म्या वयाचा होता.
- पण जॅक तिला मॅच्युअर वाटला आणि तिने त्याला प्रपोज केले. दुसरीकडे जॅकही कॅथलिनशी प्रेम करू लागला होता.
 
जॅकची आई नाराज झाली...
जेव्हा ही गोष्ट जॅकच्या आईला कळली तेव्हा ती खूप नाराज झाली. त्यांना ही गोष्ट तब्बल चार-पाच महिन्यांनंतर कळली. त्या नेहमी जॅकला कॅथलिनच्या वयाबाबत सांगत होत्या, परंतु जेव्हा कॅथलिनला जॅकपासून मूल होणार असल्याचे कळले तेव्हा त्यांनी दोघांच्या प्रेमाला स्वीकारले आणि कॅथलिनची प्रत्यक्ष भेटही घेतली. गतवर्षी कॅथलिनने जॅकच्या मुलाला जन्म दिला. हा मुलगा आता 9 महिन्यांचा झाला आहे. कॅथलिन म्हणते, 'आता आम्ही चौघे अगदी आनंदात आहोत. माझ्या दोन्ही मोठ्या मुलांना जॅक खूप आवडतो.'
 
पुढच्या स्लाइड्समध्ये पाहा, जॅक-कॅथलिन आणि त्यांच्या मुलाचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...