आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईनेच घेतला या चिमुकलीचा जीव, तरीही या कारणामुळे नाही झाला तरुंगवास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या एका महिलेने आपल्याच पोटच्या 15 महिन्यांच्या चिमुकलीला ठार मारून नदीत फेकून दिले. हे कृत्य तिने भूत-प्रेताच्या संशयावरून केले आहे. तरीही कोर्टाकडून तिला सोडण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने गुरुवारी 12 महिन्यांची सामुदायिक सेवा करण्याची शिक्षा दिली. पण, आधीच तिने कस्टडीमध्ये 529 दिवस काढल्याने तिला सोडून देण्यात आले आहे. 

 

मुलीला मारून केला किडनॅपिंगचा ढोंग
> 24 वर्षीय सोफिना निखतने मुलीला ठार मारल्याच्या कित्येक दिवसांपर्यंत पोलिस आणि कुटुंबियांची दिशाभूल केली. तिने पोलिस आणि कुटुंबियांना आपली 15 महिन्यांच्या मुलीचे अपहरण झाले असा ढोंग केला. 
> सुरुवातीला तिने पोलिसांना सांगितले होते, की तिची मुलगी सनाया हिला एका आफ्रिकी व्यक्तीने उचलून नेले. तो एक मद्यधुंद व्यक्ती होता असा दावा तिने केला. 
> यानंतर पोलिसांनी तिने सांगितलेल्या पार्कमध्ये जाऊन त्याच ठिकाणच्या लोकांची मदत घेत शोध सुरू केला. कित्येक तास पोलिस, कुटुंबीय आणि ती स्वतः पार्कमध्ये चिमुकलीचा शोध घेत होते. यानंतर जवळच्याच एका नदीत सनाया या 15 महिन्यांच्या चिमुकलीचा मृतदेह सापडला. 
> यानंतरही ती आपल्या मुलीचे अपहरण झाले होते या दाव्यावर ठाम होती. तिने कुणालाही सत्य सांगितले नाही. यानंतर पार्कमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीने तिची पोलखोल केली. 

 

भूत-प्रेतांच्या संशयावरून घेतला जीव
- वकिलांनी कोर्टात मांडलेल्या युक्तीवादनुसार, निखत 9 एप्रिल 2016 रोजी आपली मुलगी सनाया हिला हेडलबर्ग वेस्ट येथील पार्कमध्ये घेऊन गेली होती. त्याच ठिकाणी तिने मुलीला ठार मारून तिचा मृतदेह फेकून दिला. 
- सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ती पार्कमध्ये आपल्या मुलीसोबत खेळताना दिसून आली. यानंतर काही मिनिटांतच तिने चिमुकलीचे तोंड दाबण्यास सुरुवात केली. 
- सनायाने श्वास घेणे बंद केले नाही तोपर्यंत तिने तोंड घट्ट हाताने दाबला होता. चिमुकलीचा जीव गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने तिचा मृतदेह जवळच्याच नदीत फेकून दिला. 
- पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या सोफिनाने अखेर मुलीला ठार मारल्याची कबुली दिली. एका स्थानिक मौलवीने त्या मुलीला भूतबाधा असल्याचे सांगितले होते असे तिने कोर्टात म्हटले. 
- सुप्रीम कोर्टाने महिलेला मानसिक आजार असल्याने तिच्यावर नरमाई केली. तसेच 12 महिन्यांची सामुदायिक सेवा देण्याची शिक्षा दिली. यातही तिने आधीच कस्टडीमध्ये दीड वर्षे काढल्याने तिची सुटका करण्यात आली आहे. 

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...