इंटरनॅशनल डेस्क- अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये एका माथेफीरु आईने पोटच्या तीन वर्षीय चिमुरड्याची निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. चिमुरड्याची हत्या करून तिने त्याचा मृतदेह एका सूटकेसमध्ये ठेवला आणि घरामागील पाण्याने भरलेल्या खड्डयात फेकून दिला.
धक्कादायक बाब म्हणजे आरोपी आईने तिच्या चिमुरड्यामध्ये हुकुमशहा ‘हिटलर’चा आत्मा पाहिला होता. मोठा झाल्यानंतर तो हिटलरसारखा क्रुर बनेल, याच कारणाने तिने चिरमुरड्याची हत्या केली. मात्र, तिने केलेल्या कृत्याचा तिला कोणताही पश्चाताप होत नाही आहे.
निर्दयी मातेने गुन्हा केला कबूल...
- फ्लोरिडामध्ये राहाणारी मोनीक रॉबिन्सन (28) हिने गुन्हा कबूल केला आहे.
- पोलिस चौकशीत मोनीक हिने सांगितले की, तिला जॉनमध्ये (मृत चिमुरडा) हिटलरची आत्मा दिसला होता.
- जॉनच्या शरीरावर एका राक्षस राज्य करत होता. भविष्यात त्याने अनेक लोकांचे रक्त प्यायले असते, असेही तिने सांगितले.
- जॉनमधील राक्षसाचा खात्मा केल्याचे मोनीक सांगते आहे.
चाकू भोसकून केली जॉनची हत्या..
- पोटच्या पोराची हत्या करणार्या मोनीकने गुन्हा कबूल केला आहे.
- पेट्रोलिंगवर निघालेल्या पोलिसांना मोनीक स्वत: शरण गेली. तिने केलेले कृत्य सांगितले.
- मोनीक ही मानसिक रुग्ण असल्याचे कोर्टाने सांगितले आहे. तिच्यावर उपचार करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, संबंधित घटनेचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)