आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले आणि नोकरी सोडून हिने ISIS च्या विरोधात उचलली बंदूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
36 वर्षांची बेबीलोनिया ISIS च्या विरोधात युद्धात सहभागी झाली आहे. - Divya Marathi
36 वर्षांची बेबीलोनिया ISIS च्या विरोधात युद्धात सहभागी झाली आहे.
रक्का - सिरियातील बेबीलोनिया या महिलेने आपली दोन मुले आणि नोकरी सोडून ISIS च्या विरोधात बंदूक हाती घेण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. IS च्या विरोधात लढणाऱ्या ख्रिश्चन फिमेल प्रोटेक्शन ग्रुपमध्ये ती सहभागी झाली आहे.

ग्रुपमध्ये 50 महिला
- 36 वर्षांची बेबीलोनिया सिरियाच्या नॉर्थ-ईस्टर्नमधील हशकाह प्रांतात सिरियक ख्रिश्चन मायनॉरिटीमधील आहे.
- तिने कुर्दीश महिला फायटरकडून प्रेरणा घेत ख्रिश्चन फिमेल प्रोटेक्शन ग्रुप जॉइन केला आहे.
- सध्या या ग्रुपमध्ये 50 महिला आहेत. ग्रुपचा ट्रेनिंग कँप सिरियाच्या अल कहतनिएमध्ये आहे.

मुलांची काळजी, पण पश्चाताप नाही
- मी मुलांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी ISIS च्या विरोधात युद्धात सहभागी झाले आहे.
- मुला मुलांची खूप काळजी आहे, पण तरीही त्यांना सोडल्याचा पश्चाताप नाही.
- माझ्या पतीने स्वतः मला मुलांना सोडून युद्धात सहभागी होण्यास सांगितले आहे. ते स्वतःदेखिल सैनिक आहेत.
- बेबीलोनियाचा मुलगा लिमर नऊ वर्षांचा आहे. तर मुलगी गॅब्रिएला सहा वर्षांची आहे.

सिरियक ख्रिश्चन
- सिरियक ख्रिश्चन सिरियाच्या लोकसंख्येपैकी 10% असून ते नॉर्थ-ईस्टर्न प्रांतातील हशकाहमद्ये राहतात.
- हे आर्मेक पद्धतीने जीससची प्रार्थना करतात. त्यांच्यामध्ये ऑर्थोडॉक्स आणि कॅथलिक अशा शाखा असतात.
- सध्या सिरियामध्ये 89 हजार सिरियक ख्रिश्चन राहतात. पण ही संख्या वेगाने घटत आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS...