आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमासाठी 9 मुलांची आई घर सोडून पसार; म्हणते, मला पश्चाताप नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदी आणि तिचा बॉयफ्रेंड - Divya Marathi
हैदी आणि तिचा बॉयफ्रेंड

इंटरनॅशनल डेस्क - ब्रिटनच्या टाइनसाइड येथे राहणारी 9 लेकरांची आई फेसबूकवर आपल्यापेक्षा 14 वर्षांनी लहान व्यक्तीच्या प्रेमात पडली. याच प्रियकरासाठी तिने 23 वर्षांचे लग्न मोडले. गेल्या महिन्यातच तिने आपल्या 9 मुलांना देखील सोडून घरातून पसार होण्याचा निर्णय घेतला. आपल्या मुला-मुलींना सोडल्याबद्दल तिच्यावर टीका केली जात असताना तिने एक ट्वीट केले. तसेच आपल्याला प्रेमासाठी केलेल्या कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप नसल्याचे स्पष्ट केले. 

 

> 44 वर्षीय हैदी हेपवर्थ हिने अफ्रिकन टॉयबॉय ममादोऊ याच्यासाठी घर, पती आणि 9 लेकरांना सोडले आहे. 
> हैदीचा पती अॅन्डीने सांगितल्याप्रमाणे, त्या मुलाने हैदीचा ब्रेनवॉश केला आहे. तिला भूलथापा देऊन आपल्या जवळ केले आहे. 
> अॅन्डीने सांगितल्याप्रमाणे, तिने टॅटू बनवला, मेकओव्हर केले आणि सध्या आपल्या बॉयफ्रेंडसोबत जाम्बिया येथे रागत आहे. 
> काही दिवसांपूर्वीच ती आपल्या लेकरांवर प्रेम करणारी आई होती. पण, अचानक ती बदलली. आपल्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेल्या अफ्रिकनसोबत पसार होताना तिने आपल्या 9 लेकरांचाही विचार केला नाही असे अॅन्डी म्हणाला आहे.
> यावर हैदीने सोशल मीडियावर उत्तर दिले की तिने आपल्या लेकरांशी संपर्क तोडलेला नाही. ती आजही त्यांना जीव लावते. दररोज त्यांच्याशी व्हिडिओ चॅट करून संवाद साधते.

 

पुढील स्लाइड्सवर पाहा, या कपलचे आणि त्या लेकरांचे आणखी काही फोटोज...

बातम्या आणखी आहेत...