आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother Post Advertise After His Arrogant Son Be A Gentleman

आईचे सरप्राइज, उद्धटपणा सोडलेल्या मुलाचे जाहिरात लावून केले अभिनंदन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - मुलांना केवळ धाकदपटशा करून समजावण्याऐवजी त्यांच्यासमोर काही उदाहरणे मांडल्यास त्यांना काय करायचे हे समजू शकते. अमेरिकेतील न्यूजर्सीच्या कॅमडॅनमध्ये राहणाऱ्या आवेला आेनील या महिलेचा अनुभव काहीसा असाच आहे. त्यांनी आपल्या उद्धट, डांबरट मुलाला अशा पद्धतीने समजावले की त्याचे वागणे चमत्कारिकपणे बदलले. त्यानंतर बदललेल्या मुलास आईने एक सरप्राइज दिले. हा सुखद धक्का इतरांसाठी नक्कीच अनुकरणीय ठरला.

आवेला यांना एक दिवस मुलगा अल्जेलॅनी ‘एजे’ याच्या शिक्षिकेचा फोन आला. अल्जेलॅनी १८ वर्षांचा आहे. तो शिक्षिकेसोबत चांगला व्यवहार करत नसल्याची तक्रार करण्यात आली. त्यावर आवेला यांनी मुलाशी रात्री प्रदीर्घ चर्चा केली. आपल्या भूतकाळातील काही गंभीर गोष्टी सांगितल्या. महिलांचा अवमान करण्यात काय चूक असते याची त्यास जाणीव व्हावी म्हणून त्यांनी स्वत:चे उदाहरण दिले. तुझ्या आईशी कोणी गैरवर्तन करत असल्यास कसे वाटेल? असे समजावले. त्यानंतर शिक्षिकेने आवेला यांना दोन दिवसांनंतर फोन केला. त्या म्हणाल्या, तुम्ही त्यास काय समजावले मला ठाऊक नाही; परंतु त्याचे वागणे पूर्णपणे बदलले आहे.

मुलगा अलीकडेच पदवीधर बनला. त्यावर आनंदून गेलेल्या आईने त्यास एक सुखद धक्का दिला. ही गोष्ट इतर पालकांसाठीदेखील नक्कीच शिकण्यासारखी आहे. त्यांनी एजेचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्याबद्दल होर्डिंग्ज लावून त्याची स्तुती केली. त्यावर लिहिले, ‘आई आपल्या मुलाला यशस्वी करू शकेलच असे नाही, परंतु मी माझ्या मुलाला सभ्य मुलगा म्हणून तयार केले आहे. कुटुंबावर प्रेम करावे. अभिनंदन.’ एजेने हे होर्डिंग बघितल्यानंतर तो हैराण झाला. तो वारंवार हेच विचारत होता, आई, तू हे कसे काय केलेस? एवढे पैसे कशाला खर्च केलेस? त्यावर सुमारे ४६ हजार रुपये एवढा खर्च झाला. रक्कम मोठी होती; परंतु आवेला यांना पैसा योग्य ठिकाणी खर्च करावा, असे वाटले. उदाहरण निर्माण करा. हाच इतर मातांना संदेश आहे. हे मी करू शकत असेल तर तुम्हाला ते सहज जमू शकते. अनेकांना आपली मुले बंधनात ठेवून सुधारावीत, असे वाटत असते; परंतु वर्तन सुधारण्याच्या इतर पद्धतीही असतात, असे आवेला यांना वाटते.

बिलबोर्डच्या अनावरणप्रसंगी पत्रकारांनी एजेला विचारले, फलकावरील तुझे छायाचित्र पाहून सांग, तो मुलगा स्वत:बद्दल काही विचार करतोय? एजे म्हणाला, एक तरुण जीवन अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे.