आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि आईने मुलीची आत्महत्या रोखली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईस्ट यॉर्कशायर (ब्रिटन)- रात्रीचे १२.०० वाजले होते. सॅली बर्कला नुकताच डोळा लागला होता. एवढ्यात तिच्या मोबाइलवर एक संदेश आला. मित्राचा संदेश धक्कादायक होता. संदेशात सॅलीला सतर्क करण्यात आले की, तिची १४ वर्षीय मुलगी मॅसीने फेसबुकवर चिंताजनक पोस्ट केले आहे. मॅसीने लिहिले होते, "धिस इज एंड' सॅलीने संदेश वाचत-वाचत मॅसीजवळ धाव घेतली. तिचा संशय खरा ठरला. मॅसी स्वत:ला संपण्याचा प्रयत्न करत होती. तिने मुलीला वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले. पोलिस हेल्पलाइनवर फोन करून मदत मागितली. पोलिस तत्काळ दाखल झाले. मॅसीला स्वमग्नतेचा आजार आहे. तिच्यावरील उपचारामुळे त्यांनी तीन वर्षांपासून नाताळही साजरा केला नाही. मुलीसोबत सण साजरा करता येईल या विचाराने सॅली या वेळी खूप खुश होती. मात्र, मोबाइलवर संदेश येताच क्षणाचाही विलंब करता तिने मॅसीला नियंत्रणात आणले. मॅसीच्या आजाराचे निदान झाल्यापासून सॅलीने उपचारात कोणतीही कसर ठेवली नाही. मात्र, यादरम्यान अनेकदा योग्य उपचार मिळाले नसल्याची तिची खंत आहे. यॉर्कशायरच्या चिल्ड्रन मेंटल सर्व्हिसेसमध्ये आवश्यक सुविधा नाहीत. हेजेल येथील एकमेव केंद्रही बंद पडले आहे. त्यामुळे मॅसीवर व्यवस्थित उपचार होत नसल्याचे सॅलीचे म्हणणे आहे.
मॅसीने अनेकदा जीव देण्याचा प्रयत्न केला. अनेकदा पोलिसांकडे मदत मागितली. सॅलीने मुलीची देखभाल करण्यासाठी शिक्षिकेची नोकरीही सोडली. असे असले तरी मानसिक अारोग्य अधिनियमाअंतर्गत मॅसीला मानसिक आरोग्य शाखेत ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.