आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदर तेरेसा यांना संत पदाने सन्मानित करणार, पोप फ्रान्सिस यांनी केली घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हॅटिकन सिटी- गरीबांच्‍या सेवेसाठी आयुष्‍यभर कष्‍ट उपसलेल्‍या मदर तेरेसा यांना येत्या 4 सप्टेंबरला 'संत' पदाने सन्मानित करण्‍यात येणार आहे. ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी मंगळवारी ही घोषणा केली आहे. पोप फ्रान्सिस यांनी तेरेसा यांच्या दुसर्‍या चमत्काराला (मेडिकल मिरॅकल) मान्यता दिली होती.

दरम्यान, पोप फ्रान्सिस यांच्याकड़न मदर तेरेसा यांच्या दुसर्‍या चमत्‍काराला मान्‍यता देण्‍यात आली आहे. पोप जॉन पॉल (द्वितीय) यांच्या काळात 2003 मध्ये तेरेसा यांना संतपदाने सन्मानित करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. संत पद मिळवण्‍यासाठी संबंधित व्‍यक्‍तीचे दोन चमत्‍कार जगासमोर अाणणे आवश्‍यक असते.

काय आहे पहिला चमत्‍कार?
- मदर टेरेसा यांनी मोनिका बेसरा नामक बंगाली महिलेला पोटाच्‍या टयूमरपासून मुक्‍ती दिली होती.
- 2003 मध्‍ये एका कार्यक्रमात पोप जॉन पॉल सेकंड यांनी या पहिला चमत्‍काराला मान्‍यता देऊन त्‍यांना धन्य (Beatification) घोषित केले होते. संत बनण्‍याच्‍या प्रक्रियेतील ही पहिली पायरी होती.
काय आहे दुसरा चमत्‍कार ?
- इटालियन कॅथोलिक बिशप कॉन्फ्रन्सच्‍या ऑफिशियल न्यूजपेपरच्‍या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, पोप फ्रान्सिस यांच्‍याकडून टेरेसा यांच्‍रूा दुस-या चमत्काराला मान्‍यता देण्‍यात आली आहे.
- दुसरा चमत्कार हा ब्रेन ट्यूमरने पीडित ब्राझीलमधील व्‍यक्‍तीच्‍या उपचाराशी संबंधित आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, कोण होत्या मदर टेरेसा?
बातम्या आणखी आहेत...