आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mother's Be Always In Tension Because Of Health Information

अारोग्यविषयक माहितीमुळे मातांना घोर! सारख्या सूचनांनी वाढतो तणाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न - एका ताज्या अभ्यासानुसार आजच्या धकाधकीच्या जीवनातील माता या आपल्या मुलांबाबत चिंताक्रांत आणि तणावाखाली असतात. ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठात झालेल्या संशोधनानुसार, स्तनपान आणि अचानक बालमृत्यूच्या घटनांबाबत सार्वजनिक आरोग्य संदेशांची पूर्तता करता येत नसल्याने मातांना लाजिरवाणे, दुर्लक्षित आणि एखादा अपराध केल्यासारखी बोच लागून राहते.

मातांना मातृत्वविषयक समस्यांची सोडवणूक अापल्या अंत:प्रेरणेतून करण्यास सांगितले जाते. मात्र, एकीकडे विरोधाभासी माहिती आणि दुसरीकडे आदर्श मातृत्वाचा उभा केलेला बागुलबुवा अशा कोंडीमुळे त्या पार गोंधळून जातात. संशोधकांनी सांगितले, मुलांसाठी स्तनपान हेच सर्वाेत्तम असते. तसेच बाळाला नेहमी पाठीवर झोपवणे उत्तम असते. मात्र हे केले नाही तर जाणीव करून दिल्या जाणाऱ्या धोक्यांमुळे मातांच्या जिवाला घोर लागून राहतो. आरोग्यविषयक सार्वजनिक अभियाने, आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक व्यक्ती तसेच इतर लोक सत्य समजण्यासारखी आकडेवारी आणि निर्णय घेण्यास मदत करून मातांवर येणारा ताण कमी करण्यात साहाय्य करू शकतात. बाळाला बाटलीने दूध पाजण्याचा निर्णय घेणाऱ्या आईला कोणत्याही बाटलीविना रुग्णालयात सुटी दिली जाऊ शकते. मिश्रणाच्या सूत्राबाबत कोणतेही निर्देश नाहीत तर मातांच्या मनात वंचित तसेच कोणताही पाठिंबा नसल्याची जाणीव निर्माण करू शकते, असे रोव्ह म्हणाल्या.

दरम्यान, अचानक बालमृत्यू लक्षणांवरील ‘सेफ स्लीप स्पेस’ सारख्या अभियानांमुळे बालमृत्यूचा दर यशस्वीरीत्या घटला आहे. तसेच पालकांना त्यांच्या बाळांना पाठीवर झोपू घालण्यात मदत मिळाली आहे. संदेशांमुळे समस्यांची सोडवणूक आणखी सोपी होते.

असा प्रयोग : मुलांचे पालनपाेषण कसे करावे याच्या सेवेसाठी प्रवेशादरम्यान संशोधकांनी २० महिलांची मुलाखत घेतली. त्यापैकी ४०% महिलांत सामान्यापेक्षा चिंतेची जास्त लक्षणे आढळली. ४५% महिलांत मध्यम ते तीव्र प्रकारचा ताण असल्याचे संशोधकांना आढळले.

चिंतेमुळे अारोग्य समस्या : या प्रकारची चिंता मातांना झोपण्यापासून रोखू शकते. त्यांचे स्नायू जखडले जातात, खाण्यापिण्याच्या सवयींत हस्तक्षेप होतो. काही प्रकरणांत ही दौर्बल्य आणणारी व्याधी ठरू शकते, असे संशोधक हीथर रोव्ह म्हणाल्या.